आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपातळीवरील चित्रपट महोत्सव; नाशिकमध्‍ये प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त राज्यातील आठ शहरांमध्ये राज्य सरकारतर्फे चित्रपट महोत्सव सुरू करण्यात येणार आहे. याची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून नाशिक येथे केली जाणार असून पाच ते अकरा एप्रिलदरम्यान औरंगाबाद येथे चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा समारोप मुंबईत 2 मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी शुक्रवारी दिली.
15 ते 21 फेब्रुवारी नाशिक, 22 ते 28 फेब्रुवारी नागपूर, 1 ते 7 मार्च अमरावती, 8 ते 14 मार्च पुणे, 15 ते 21 मार्च रत्नागिरी, 5 ते 11 एप्रिल औरंगाबाद, 12 ते 18 एप्रिल कोल्हापूर, 26 एप्रिल ते 2 मे मुंबई अशा आठ शहरांत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास चित्रपटांच्याच माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून चित्रपट महोत्सवाचे आयोजन राज्यातील आठ शहरांमध्ये करण्यात येणार आहे. या महोत्सवात दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र, कालिया मर्दन चित्रपटातील काही दृश्येही दाखवण्यात येणार आहेत.