आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Sudhir Mungantiwar Comment On Shiv Sena

शिवसेनेने नुसते अाराेप न करता विकासांवर लक्ष द्यावे; मुनगंटीवारांचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपच्या कारभारावर नेहमीच टीका करणाऱ्या शिवसेनेला उत्तर न देण्याचा निर्णय भाजपने घेतला अाहे. मित्रपक्षाने एकमेकांवर टीका करण्याऐवजी विकासकामे करण्यावर आणि जनतेपर्यंत विकासकामे पोहोचवण्यावर भर देणे आवश्यक अाहे, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ प्रश्नावरून सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही उद्धव ठाकरे शरसंधान करीत असतात. युती तुटण्यापर्यंत दाेन्ही पक्षांकडून इशारे दिले जातात. याविषयी विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, ‘मागील सरकारला कंटाळूनच जनतेने आम्हाला सत्ता दिली आहे. शिवसेना आणि भाजप नेहमी एकमेकांसोबत असून यापुढेही साेबतच राहणार आहोत. सरकार दुष्काळग्रस्तांसाठी योग्य ती मदत करीत आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनाही ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. बाहेर जरी काहीही चित्र दिसत असले तरी आम्ही एकत्रच आहोत. शिवसेनेने टीका करण्याऐवजी सरकारच्या विकासकामांबाबत जनतेत चर्चा केली पाहिजे. या सरकारकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. शिवसेनेने कितीही टीका केली तरी आम्ही उत्तर देण्याचे ठरवले आहे. नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे वागतात तसेच आम्ही वागणार आहोत. माेदी प्रत्येक टीकेला उत्तर देत नाहीत. वेळ येईल तेव्हा ते बरोबर उत्तर देतात,’ असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.