आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Of Maharashtra Revenue Dept., In Limca Book Of Records

महसूल विभाग लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये, 42 लाख प्रमाणपत्रांच्या वितरणाचा विक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विविध योजनांची सुमारे 42 लाख प्रमाणपत्रे शाळांमध्ये व घरपोच केल्याच्या कामगिरीबद्दल राज्याच्या महसूल विभागाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे.
राज्यात पंधरा वर्षे वास्तव्य असणाºयास बोनाफाइड प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे अवघड झाले होते. यासाठी महसूल विभागाने शाळेचा दाखला जोडल्यास संबंधित विद्यार्थ्याला बोनाफाइड प्रमाणपत्र देण्याची सोय केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विविध योजनांना एकत्र करून ‘सुवर्ण जयंती राजस्व अभियाना’ अंतर्गत या सर्व योजना राबवल्या. बोनाफाइड प्रमाणपत्रासह इतर आवश्यक प्रमाणपत्रेही त्वरित देण्यास सुरुवात करून विभागाने 42 लाख विविध प्रमाणपत्रांचे वितरण गावात आणि शाळेत केले.
महसूल विभागातील एका अधिकार्‍याने विभागाची प्रमाणपत्र वितरणाची बाब लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सकडे पाठवली. ‘लिम्का बुक’ने या सर्व बाबींची तपासणी केली. काही कागदपत्रांची मागणी केली. सरकारने कागदपत्रे पुरवल्यानंतर लिम्का बुकने याची नोंद करण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकरणात बराच वेळ गेला, मात्र तोपर्यंत महसूल विभागाने 78 लाख दाखले वितरित करून 42 लाखांचा आपलाच विक्रम मोडला.