आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Road Transport Minister Diwakar Raote Plans To Make Classrooms Out Of Buses

भंगारात काढलेल्या एसटी बसमध्ये भरेल आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा: रावते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भंगारात काढलेल्या एसटी बसमध्ये आता आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची शाळा भरणार आहे. या शाळांना वर्ग घेण्यासाठी भंगार बस देणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

ते म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाला आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. एसटी महामंडळात दरवर्षी निकामी बस भंगारात काढल्या जातात. सामाजिक बांधिलकी म्हणून आदिवासीबहुल भागांना अशा बस देण्याचा निर्णय विभागाने घेतला.
आदिवासी भागातील शाळांना प्रत्येकी दोन बसेस देण्यात येतील. त्यानंतर शाळा आपल्या गरजेप्रमाणे या बसेसचा वापर करतील.
शाळेसारखी बस सजवली:
या बसेसमध्ये वर्ग खोल्यांसारखीच अंतर्गत सजावट असेल. फळा आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे रावते यांनी सांगितले.