आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी मेडिकलमध्ये राज्यातील मुलांनाच मिळणार प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय व दंत महाविद्यालयांतील ८५ टक्के कोट्यातील प्रवेश राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. यामुळे राज्यातील गुणवंतांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

खासगी महाविद्यालयांनी ८५ टक्के जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, तर १५ टक्के संस्थात्मक कोट्यातून भरण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र काही खासगी महाविद्यालये व इतर राज्यांतील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याला आव्हान दिले होते. अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...