मुंबई - व्यावसायिक व प्रायोगिक नाट्यनिर्मिती संस्थांच्या अनुदान योजनेअंतर्गत नाटकांचा दर्जा ठरवण्यासाठी सरकारने शुक्रवारी नाट्य परीक्षण समिती जाहीर केली. दोन्ही समितीत बारा-बारा अशासकीय सदस्य असून समितीचा कालावधी 3 वर्षे राहील.
व्यावसायिक व संगीत नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त समितीत सुरेश चिखले, अभिराम भडकमकर, राजन ताम्हणे, राजन बणे, अरविंद पिळगांवकर, रवींद्र पाथरे, कमलाकर नाडकर्णी, संजय तोडणकर, प्रसाद वालावलकर, विजय गोखले, निशिगंधा वाड आणि फय्याज या बारा अशासकीय सदस्यांचा समावेश आहे, तर प्रायोगिक नाटकांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षण समितीत मकरंद साठे, वामन तावडे, अरुण काकडे, नंदू माधव, शरद भुताडिया विश्वास मेहेंदळे, कृष्णा बोरकर, अनंत अमेंबल, संजीव वढावकर, दीपक राजाध्यक्ष, सुप्रिया विनोद आणि प्रियंका बांदिवडेकर या बारा मान्यवरांचा समावेश आहे. या दोन्ही समितीचे सदस्य सचिव म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे काम पाहतील.