आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुकांची गर्दी; गुरुवारी राज्यस्तरीय बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप प्रदेश कार्यकारिणीची १७ आॅगस्ट रोजी बोरिवलीत बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला फडणवीस सरकारमधील मंत्र्यांसह पक्षाचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या बैठकी वैशिष्ट्ये म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. यात काही मोठ्या नावांचाही समावेश असल्याचे कळते.
 
संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांना राजीनामा दिल्यानंतर प्रथमच तीन वर्षांत त्यांच्या विनापक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. भुसारी यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांना तो देण्यास भाग पाडला होता, असे कळते. फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय राज्यात तळगाळापर्यंत जात नसल्याचा आक्षेप घेण्यात आल्याने भुसारींना जावेे लागले हाेते. स्वत: मुख्यमंत्र्यांनी याविषयी आपली मते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मांडल्यानंतर काही दिवसांनी भुसारींना पदमुक्त करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांचे दोन पुत्र माजी खासदार नीलेश राणे तसेच आमदार नितेश राणे, राणेसमर्थक आमदार कालिदास काेळंबकर, माजी मंत्री सुरेश धस तसेच जयदत्त क्षीरसागर अशा काही प्रमुख नावे सध्या भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. पक्षाकडून यापैकी बहुतांश नावांच्या प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. पण, ते गुरुवारच्या प्रदेश कार्यकारिणीत प्रवेश करणार की जिल्ह्यांमधील भव्य कार्यक्रमात गाजावाजा करून प्रवेश कार्यक्रम ठेवायचा. यावरून मतप्रवाह असल्याने सध्या तरी या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रवेश हाेणार की नाही, याविषयी खातरजमा होऊ शकलेली नाही.    
 
राणेंचा प्रवेश हा भाजपसाठी तसेच स्वत: माजी मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. स्वत: राणेंना वाजतगाजत  प्रवेश करायचा असून थेट राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या उपस्थितीत त्यांना हाती कमळ घ्यायचे आहे. आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सिंधुदुर्गमधील अत्याधुनिक हाॅस्पिटलच्या उद्घाटनाला शहा यांना बोलावून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा राणेंची इच्छा आहे. मात्र, त्यांची ही मनोकामना सध्या तरी पूर्ण होताना दिसत नाही. दरम्यान, या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

फेरबदलाचीही चर्चा   
प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. दानवे यांच्याविरोधातील तक्रारींमध्ये दिवसेंदिवस हाेणारी वाढ आणि मंत्रिमंडळाचे निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात अालेले अपयश या पार्श्वभूमीवर दानवेंना पदावरून दूर केले जाईल, असे बोलले जात आहे. पण, या चर्चेत तथ्य नसल्याचे कळते. त्याचबरोबर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता तसेच निष्क्रियतेचा शिक्का असलेले आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांना पदावरून दूर केले जाईल, अशाही शक्यता समोर येत आहेत. मात्र, त्याला काही दुजोरा मिळू शकलेला नाही
 
 
बातम्या आणखी आहेत...