आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव; राष्ट्रवादीचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना असो की मनसे हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची आवई उठवत असले तरी मुंबई शहरासाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तेव्हा मात्र हे दोन्ही पक्ष गप्प का राहिले’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला अाहे.  मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव भाजपच खेळत असल्याचा आरोपही पक्षाचे मुख्य नवाब मलिक यांनी केला अाहे. 
  
पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले, ‘नीती आयोगाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्याची विनंती केली. तेव्हा शिवसेना, मनसे गप्प राहिले. उलट राष्ट्रवादीने विरोध केला हाेता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचाच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा मुद्दा आम्ही लावून धरू,’ असे मलिक म्हणाले.
 
अजित पवार यांनी नाशकात महापालिकेच्या होर्डिंग्जवरून छगन भुजबळांचे छायाचित्र हटविण्याचे समर्थन केले होते. त्यासंदर्भात विचारले असता मलिक यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ आली. ‘भुजबळ  हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना बाजूला करण्याचा प्रश्नच नाही. अजित पवारांनी त्यांचे नाव घेतलेले नाही,’ असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...