आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूमिका स्पष्ट करा, अन्यथा ‘वर्षा’वर बुलडोझर फिरवेन, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आंबेडकर भवनाचा वाद दोन आंबेडकरी गटांतील अाहे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका जाहीर केली, तर त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानावर मी बुलडोझर फिरवीन,’ असा गर्भित इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत िदला.

आंबेडकर म्हणाले, ज्यांच्यावर वैयक्तिक आरोप करता येत नाहीत, ज्या पक्ष, नेते, संघटना यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवून संपवता येत नाही, त्यांच्या चळवळीची केंद्रे उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान संघ व भाजपने आखलेले आहे. २५ जूनच्या मध्यरात्री पाडण्यात आलेले दादरचे आंबेडकर भवन त्याच प्रवृत्तीचा भाग आहे. आंबेडकर भवन पाडताना पालिकेने नियमांचे पालन केले नाही. वीज मीटर चोरून नेले, वीज बेकायदा तोडण्यात आली, इमारतीत झोपलेल्या लोकांंना इशारा दिला नाही. यासंदर्भातले सर्व पुरावे मी मुख्यमंत्र्यांना िदले, त्यांनी माझ्यासमोर कारवाईचे आदेश िदले. मात्र, दोषींवर अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

१५ जुलै रोजी मोर्चा
आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ १५ जुलै रोजी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा डाव्या लोकशाही आघाडीतील घटक पक्षातर्फे काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पक्षाचा नसून लोकांचा असेल, आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी डावी आघाडीतील घटक पक्षांची बैठक झाली. प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे, भीमराव बनसोड, काॅ. किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, भारत पाटणकर, गेल आॅमव्हेट, शैलेंद्र कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...