आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे गाणे रंगले, राज ठाकरेंचे भाषण रंगलेच नाही; बघा गाण्याचा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी माणसासाठी मी कुणाचेही पाय चाटेन, पण महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी कराल तर पाय पण छाटेन, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दादरमध्ये दिला.
 
‘उठा उठा उठा आभाळ फाटलंय, पडद्याच्या आगीत रान सारं पेटलंय, देश सारा राख झाला, गनिमाचा सारा वेढा पडला, तुमच्या राजाला साथ द्या’, हे सध्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार केलेले खास गाणे ‘मनसे’ने सादर केले. या उत्स्फूर्त गीताच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी पक्षापासून दुरावलेल्या मुंबईतील मराठी मतदारांना पुन्हा एकदा आर्त हाक िदली. सेना-मनसेच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचे स्पष्ट करून ‘होय, मी सात वेळा उद्धवला फोन केला. कारण मला भाजपला दूर ठेवायचे होते. त्यांना आमचा हात नको आहे. आता भांडायला, कपडे फाडायला आम्ही मोकळे आहाेत, असा इशारा राज यांनी दिला. ‘राज ठाकरे पाय चाटेन, वाकेन, गुडघेही टेकेन, पण स्वत:साठी नाही तर मराठी माणसांसाठी,’ असे ते म्हणाले. 

शिवाजी मंदिरात मनसेने मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. राज यांनी या वेळी खास शैलीत शिवसेना, भाजप, नरेंद्र माेदी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केले. मेळाव्यातील राज यांचे भाषण नेहमीप्रमाणे रंगले नाही. मात्र अवधूत गुप्ते यांच्या गाण्याने सभेत चांगलाच जोश भरला.या गाण्याला पाचवेळा वन्समोअर िमळाला. मात्र गाण्याप्रमाणे राज यांच्या भाषणात काही रंगत आली नाही.

महापालिकेत युती तोडता, राज्यात कशी काय ठेवता?
राज्यातील सेना-भाजप युतीचे राज यांनी वाभाडे काढले. ‘महापालिकेत युती तोडता आिण राज्यात कशी काय ठेवता?’ असा सवाल त्यांनी विचारला. ‘सेनेला भाजपला दुखवायचे नाही. कारण, युतीतून बाहेर पडल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला महापौर बंगला िमळणार नाही, अशी त्यांना भीती आहे,’ असा गंभीर आरोप त्यांनी सेनेवर केला.

नरेंद्र मोदी, शहा यांच्यावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आिण भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर राजनी सडकून टीका केली. ‘त्यांना मुंबई िमळाल्याचे अजूनही दु:ख आहे. त्यामुळे भाजपला पहिल्यांदा विदर्भ बाजूला करायचा आहे. नंतर त्यांना मुंबईला तोडायचे आहे’ असा आरोप त्यांनी केला.  ‘भाजपवाल्यांच्या डोक्यात काय चाललंय, हे जरा मराठी माणसाने समजून घ्यावे’ असे आवाहन त्यांनी केले.

सभा रंगलीच नाही...
- शिवाजी मंदिर तुडुंब भरले होते. पण अवधूत गुप्ते याचे गाणे सोडले तर सभा काही रंगली नाही. 
- राज यांच्या भाषणात पूर्वीसारखा आवेश नव्हता. त्यांच्या भाषणतही तेच तेच मुद्दे होते. 
- व्यासपीठावर राज यांच्या बाजूला पुण्याचे दीपक पायगुडे, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आणि नितीन सरदेसाई असे माजी आमदार बसले होते. 
- राज यांचे भाषण शिवाजी मंदिरसारख्या सातशे अासन क्षमतेच्या छोट्या सभागृहात आज पहिल्यांदाच झाले.   
- तुमच्या राजाला साथ द्या, हे गाणे राज यांना आवडले. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी गुप्ते, बांदोडकरांना व्यासपीठावर बोलावून गाणे पुन्हा म्हणायला लावले.
 
पुढील स्लाइडवर पाहा, राजाला साथ द्या... या गाण्याचा व्हिडिओ....
 
 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)