आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीतील संबंध आणखी ताणले गेले तर, वेगळा विचार करण्याशिवाय पर्याय नाही -उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य सरकारचा पाठिंबा काढण्यासंदर्भात आम्ही संयमी विचार करत आहोत. परंतु, संबंध ताणले गेले तर वेगळा विचार करावा लागेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा कट असून, मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प सरकारने दडपले, असा खळबळजनक अरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, की भाजपशी युती तोडण्याची मानसिकता नव्हती. मात्र, संबंध खराब झाल्याने युती तोडावी लागली. परंतु, शिवसेनेची आता नवी वाटचाल सुरु झाली आहे. मुंबई महापालिका सर्वात जास्त पारदर्शक असल्याचा अहवाल केंद्राने दिला आहे. परंतु, केवळ मतांसाठी भाजप हा अहवाल खोटा ठरवत आहे.
 
मुंबई महापालिकेवर माफियांचे राज्य असल्याचा आरोप करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी बोलणे मात्र उद्धव ठाकरे यांनी टाळले.

गुजरातमधील पटेल आंदोलनाचा नेता हार्दीक पटेल याने काही दिवसांपुर्वी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ही भेट राजकीय हेतूने घेतली नव्हती असे स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिले. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी 'मोदी मातोश्रीवर आलेले चालतात, परंतु पटेल आलेले चालत नाही', असा प्रतिप्रश्न करत हार्दीक पटेल सोबत युती केली नाही असा खुलासा केला आहे.
 
केंद्र सरकारला शिवसेनेचा पाठिंबा नाममात्र आहे, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, की केंद्रातील कोणताही निर्णय घेताना शिवसेनेला विचारात घेतले जात नाही.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...