आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार निव्वळ इव्हेंट मॅनेजमेंट, राधाकृष्ण विखे पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - केंद्र आणि राज्य सरकार हे निव्वळ इव्हेंट मॅनेजमेंट सरकार आहे. या सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. आतापर्यंत या दोन्ही सरकारांनी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे या सरकारांविरुद्ध सर्वत्र निराशेचे वातावरण असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केली. मनमाड नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अायाेजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार अनिल आहेर, शहराध्यक्ष अफझल शेख पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. शहराचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता काँग्रेस उमेदवारांत आहे व या विकासासाठी सत्ता नसली तरी निधी आणण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असल्याचही विखे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...