आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रलयानंतरची गोष्‍ट: अद्यापही राज्यातील 158 बेपत्ताच, सरकारनेही आशा सोडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तराखंडमधील महाप्रलयात राज्यातील 158 यात्रेकरू बेपत्ता असून यात मराठवाड्यातील सर्वाधिक म्हणजे 71 जणांचा समावेश आहे. बचावकार्यासाठी डेहराडूनला गेलेले राज्याचे पथकही परतले असून सरकारनेही आता या यात्रेकरूंचा शोध लागण्याची आशा सोडल्याचे दिसत आहे. तथापि, त्याबाबत अद्याप जाहीर घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी मदतकार्याचा आढावा घेतला.


मंत्रालयातील आपल्या दालनात झालेल्या आढावा बैठकीनंतर कदम म्हणाले की, राज्यातील 158 यात्रेकरू अद्याप बेपत्ता आहेत. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता असलेल्या यात्रेकरूंचा शेवटचा मोबाइल कॉल रुद्रप्रयाग आणि गौरीकुंड येथून आल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांची वाचण्याची शक्यता कमीच आहे. यात्रेकरूंच्या मदतीसाठी गेलेले राज्याचे पथकही परतले आहे, असेही कदम यांनी सांगितले.


3014 यात्रेकरू राज्यातील अडकले होते
2,852 यात्रेकरूंची सुटका करण्यात यश


विभाग बेपत्ता
औरंगाबाद 71
नागपूर 44
पुणे 28
नाशिक 04
अमरावती 04
जिल्हा आकडे
परभणी 21
औरंगाबाद 14
बीड 12
जालना 09
हिंगोली 06
लातूर 05
नांदेड 04


वारसांना लवकरच मदत
सर्व बेपत्ता यात्रेकरूंबाबत आशा मावळत चालली आहे. उत्तराखंडच्या सरकारने त्यांना मृत घोषित केल्यानंतरच तेथील सरकार आणि महाराष्‍ट्र शासनाच्या वतीने वारसांना मदतीची घोषणा करता येऊ शकेल, असेही पतंगराव कदम यांनी या वेळी सांगितले.


बेपत्ता यात्रेकरूंची संख्या चार हजारांवर
बेपत्ता यात्रेकरूंची संख्या 4 हजारांवर असल्याची भीती राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष ए. शशिधर रेड्डी यांनी व्यक्त केली. केंद्राने 4 हजारावर बेपत्ता असल्याचे म्हटले असले तरी स्वयंसेवी संस्थांनुसार तो 11 हजार 600 पेक्षा अधिक आहे.


मदतकार्याच्या आघाडीवर...
०केदारनाथसाठी लष्कराचे पथक वेगळा रस्ता तयार करणार.
०सोनप्रयाग, गोमकार ते केदारनाथ हा 20 किलोमीटर मार्ग
०पाऊस उघडल्याने मदतकार्य पुन्हा वेगाने सुरू. संबंधित. पान 5
०अन्नाची पाकिटे व औषधे मदत छावण्यात पुरेशा प्रमाणात पोहचल्याचा दावा.