आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State's Medical Education Minister JITENDRA AWHAD Who Is Now Known As Friend's Minister

'कॉफी विथ स्टुंड्टस' आणि विद्यार्थीमंत्री जितेंद्र आव्हाड!'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यातील कळवा भागातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच कॅबिनेट मंत्रीपद बहाल केले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाबरोबरच फलोत्पादन मंत्रालया त्यांच्याकडे देण्यात आले आहे. प्रथमच मंत्रीपद मिळाल्याने उत्साहात असलेल्या आव्हाडांनी आपल्या आक्रमक शैलीप्रमाणे जबरदस्त काम करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात पिकणा-या फलोत्पादनाचा उत्तम मार्केटिंग व ब्रॅंडिंग व्हावे म्हणून त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेऊन ब्रॅंड अॅम्बेसिडर व्हावे अशी विनंती केली. बच्चन यांनीही तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणूनही आव्हाड यांनी आघाडी घेतली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना मोफत वायफाय, सरकारी रूग्णालयात 24 तास पोस्टमॉर्टेम करणे यासारखे काही निर्णय धडाधड घेतले. अनेक सरकारी रूग्णालयाला भेटी दिल्या. तेथील अडचणींची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी अधिका-यांना कामाला लावले आहे. याचबरोबर कळव्यातील राजीव गांधी महाविद्यालयातील 30 मुलींचे लैंगिक शोषण करणा-या प्राध्यापक शैलेश नटराजन याला अटक करण्यासाठी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणे असो की कोठे अपघात झाला तेथे हजर होणे असो यासारखी कामे धडाधड करताना आव्हाड दिसत आहेत.
तरूण वर्गात विशेष उच्चशिक्षित विद्यार्थ्यांत आव्हाड यांनी ऊठबस वाढविली आहे. याचाच भाग म्हणून आव्हाड यांनी “कॉफी विथ स्टुंड्टस” (Coffee with Students) या कार्यक्रमांर्गत महाविद्यालयाच्या भेटीला जात आहेत. आव्हाड यांनी नुकतेच मुंबईतील जे. जे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी “कॉफी विथ स्टुंड्टस” उपक्रमातंर्गत सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यावर, प्रश्नांवर सडेतोड उत्तर देत आव्हाडांनी विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली व युवकांचे आपण 'नायक' असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. याद्वारे आव्हाडांची ‘स्टुडंट्स फ्रेंड्स मिनिस्टर’ अशी आपली प्रतिमा जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुढे आणखी वाचा, जितेंद्र आव्हाड यांच्या कॉफी विथ स्टुंड्टस या उपक्रमाबाबत...