आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stay On LBT ; Shivsena Delegation Demanding To Governor

‘एलबीटी’ला स्थगिती द्या; शिवसेना शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईसह संपूर्ण राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हस्तक्षेप करण्यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडाळाने गुरुवारी राज्यपाल के. शंकरनारायण यांची भेट घेऊन निवेदन दिले.


या वेळी दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासह शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. राज्यपालांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. एलबीटीच्या जाचक अटींमुळे व्यापा-यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लहान दुकानदारही भयभीत झाले आहेत. एलबीटीच्या अंमलबजावणीनंतर नियमांनुसार कागदपत्रांची पूर्तता झाली नाही तर दंडात्मक कारवाई सोबत तुरुंगातही जावे लागेल, अशी भीती दुकानदारांना वाटत आहे. एलबीटीच्या नियमावलीबाबत शासनाकडून सुस्पष्टता नाही. त्यामुळे दुकानदारांनी संप पुकारला आहे.


दंडाची कारवाई थांबवा
राज्य शासनाला एलबीटीची अंमलबजावणी करण्यापासून रोखावे, तसेच याबाबत सुस्पष्टता येण्यासाठी सर्व सहमतीने एक समिती नेमावी. या समितीत महापालिकांमधील पदाधिका-यांना व विरोधी पक्षातील सदस्यांनाही सहभागी करून घ्यावे आणि व्यापा-यांवर सरकारने उगारलेल्या दंडात्मक कारवाईस रोखावे, अशी विनंतीही शिवसेनेकडून देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. बुधवारीच उद्धव ठाकरे यांनीही एलबीटी रद्द
करण्याची मागणी केली होती.