आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या साेयीने शुल्क घ्यावे : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही न राहता रुग्णांच्या साेयीने शुल्क घेण्याबाबत सामंजस्याने ताेडगा काढावा, असे अावाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच १०४ आणि १०८ या विनाशुल्क दूरध्वनी क्रमांकावर संबंधितांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची सुविधा केल्याचे ते म्हणाले.

असहकार्य करणाऱ्या रुग्णालयांची तक्रार करता येईल. पालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांसाठी पालिकेकडे, इतर शहरी भागासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे व ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येऊ शकेल. या स्तरावर तक्रारीचे निवारण न झाल्यास उपसंचालक व सहसंचालक डॉ. बी. डी. पवार (रुग्णालये) यांच्याशी संपर्क साधता येईल.
बातम्या आणखी आहेत...