आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींचा पुतळा उद्ध्वस्त करणे निषेधार्हच, साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा उद्ध्वस्त करण्याचे कृत्य सांस्कृतिकदृष्ट्या भीषण व निषेधार्ह आहे. यापुढील काळात कोणकोणती शिल्पे कोणाकोणाच्या डोळ्यात खुपतील याबाबत सांगता येणार नाही,  असे मत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी गुरुवारी व्यक्त केले. 
   
लोकवाङ््मयगृह आणि चित्रकार शंकर पळशीकर आर्ट फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या व दीपक घारे लिखित ‘प्रतिभावंत शिल्पकार : रेनेसान्स ते विसावे शतक’ या पुस्तकाचे प्रकाशन रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले  त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कला समीक्षक रंजन जोशी, दीपक घारे, चित्रकार प्रभाकर कोलते उपस्थित होते. मतकरी म्हणाले, आपल्याकडे शिल्पकला म्हटली की स्मारकशिल्पेच लोकांच्या डोळ्यांसमोर येतात. स्मारकशिल्पे बनवतानाही ती ठरावीक पद्धतीनेच बनवली गेली पाहिजेत, असा आग्रह धरला जातो. त्यामुळे सर्व व्यावहारिक बाजू लक्षात घेऊन शिल्पकारांनाही काही बंधने येतात. शिल्पकलेतील विविध संकल्पनांचे स्वागत होणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक तसेच देशात ज्या प्रतिभावंत शिल्पकारांनी अप्रतिम शिल्पे निर्माण केली त्यांचा परिचय दीपक घारे यांनी लिहिलेल्या पुस्तकात नेमकेपणाने करून देण्यात आला आहे. शिल्पकलेचे अभ्यासक तसेच या विषयात रुची असणाऱ्यांसाठीही हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.   

स्मारकशिल्पे म्हणजे शिल्पकला नव्हे  
‘आपल्याकडे पुतळ्यांनाच शिल्पकला म्हणतात. मात्र, स्मारकशिल्पे म्हणजेच शिल्पकला नव्हे. समाजाचे याबाबतीत प्रबोधन करण्याची गरज आहे. चित्रकलेचे शिक्षण घेतलेला माणूस उदरभरणासाठी आधी त्या विषयातील शिक्षकी पेशाकडे वळतो. मात्र चित्रकार, शिल्पकलेचे शिक्षण घेतलेल्यांनी बाकी उद्योगात न पडता फक्त शिल्पकार, चित्रकार म्हणूनच करिअर करण्याची गरज आहे. तसे झाल्यास या कलांमध्ये अधिक उत्तम काम होऊ हाेईल, असे काेलते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...