आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी देणार ७० टक्के तरुण उमेदवार : पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अागामी पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ७० टक्के तरुणांना उमेदवारी देईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तरुणांचा पक्ष आहे, असा संदेश सर्वत्र जाईल. त्यामुळे आतापासूनच नवे चेहरे शोधण्यास सुरुवात करा. तरुणांची नवी फळी उभी केल्यास पक्षाला नक्कीच उभारी मिळेल,’ असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याचे प्रभारी, राष्ट्रीय प्रतिनिधी, जिल्हा निरीक्षक, सर्व फ्रंट प्रमुख तसेच जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष यांची बैठक बुधवारी मुंबईत झाली. या वेळी पवारांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे नेते, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘सन १९९९ मध्ये सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री हे तरुण होते. त्यातूनच िदवंगत आर. आर. पाटील, जयंत पाटील, िदलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व पुढे आले. राष्ट्रवादीचे मंत्री म्हणजे काम करणारे, अशी तेव्हा चर्चा होती. अाता सत्तेत नसताना काम करण्याची सर्वात जास्त संधी असते. त्या संधीचा फायदा घ्या. सर्वसामान्यांशी संवाद वाढवून त्यांच्या प्रश्नांसाठी लढा द्या,’ असे पवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...