आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sting Ray Fish Bit 55 Devotee, They All Admitted In Hospital

‘स्टिंग रे’ माशांच्या डंख मारल्यामुळे 55 भाविक दवाखान्यात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या वेळी मंगळवारी गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे माशाने डंख मारल्यामुळे सुमारे 55 भाविकांना इस्पितळात दाखल करावे लागले होते. आता शुक्रवारी पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन असल्याने या माशांच्या त्रासापासून भाविकांना वाचवण्यासाठी सरकार उपाययोजना करीत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री उदय सामंत यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.


सामंत यांनी सांगितले की, गिरगाव समुद्रात स्टिंग रे तर गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात जेली फिश मोठ्या प्रमाणावर आहेत. भरतीच्या वेळेला स्टिंग रे समुद्रकिनारी आले आणि ओहोटीनंतर ते किना-यावरील वाळूत रुतून बसले होते. या माशांनी डंख मारल्याने भाविकांना इस्पितळात दाखल करण्यात आले. वाळूमध्ये मोठ्या प्रमाणावर स्टिंग रे असल्याने भाविकांना विसर्जनाच्या वेळी पुन्हा होणारा त्रास लक्षात घेता हे मासे काढणे अत्यंत गरजेचे आहे.
गणेशोत्सवात मासेमारीस प्रतिबंध असतो. मात्र आता कोळी बांधवांना तशी परवानगी दिली आली. गणेश मंडळांनी विसर्जनाच्या वेळेस कोणती काळजी घ्यावी यासाठी त्यांच्याबरोबरही बैठक घेणार असल्याचेही सामंत म्हणाले.
‘स्टिंग रे’चा डंख जीवघेणा


‘स्टिंग रे’ला स्थानिक कोळी ‘पाकट’ म्हणतात. या माशाला काइटफिश वा प्लेट फिश असेही म्हणतात. स्टिंग रे ने छातीवर डंख मारल्यामुळेच प्रख्यात क्रोकोडायल हंटर स्टीव इरव्हिन यांचे निधन झाले होते. या माशाच्या शेपटीला एक काटा असतो. जेव्हा संकट येते तेव्हा हा मासा विंचवाप्रमाणे या काट्याचा डंख मारतो. त्याचा डंख इतका जोरदार असतो की माणसाचे प्राणही जाऊ शकतात. हा मासा मासेबाजारात 400 ते 500 रुपयांना विकला जातो. मात्र हा पकडणे जोखमीचे असल्याने कोळी बांधव सहसा तो पकडत नाहीत.