आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खारघरमध्ये दगडफेक, हाणामारी; 2 रिक्षा संघटनांमधील वाद, 5 जणांसह पोलिस जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खारघर स्टेशन परिसरात 2 रिक्षा संघटनांमध्ये दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 5 रिक्षाचालक व पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. रिक्षा संघटनांच्या वादामुळे खारघर पोलिस स्टेशन परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

 

आज दुपारी एकता रिक्षा युनियन आणि तळोजा युनियन या रिक्षा संघटनांमध्ये वाद झाला. हा वाद इतका चिघळला की दोन्ही संघटनांच्या रिक्षाचालकाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. मात्र तळोजा रिक्षा युनियनच्या रिक्षा चालकांनी स्वतःहून रिक्षा फोडल्या व नंतर आमच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केल्याचा आरोप खारघर रिक्षा युनियनने केला आहे. त्यानंतर आपण दागडफेक केल्याचे खारघरच्या रिक्षा चालकांनी म्हटले आहे. 

 

या दगडफेकीत महेंद्र कोळी (कोपरा गाव), देविदास ठाकूर (कोपरा), उत्तम तांबडे (बेलपाडा) रामनाथ ठाकूर(कोपरा), कैलास ठाकूर हे रिक्षाचालक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी पोलिस कर्मचारी राजेश वाठोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...