आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - केंद्रीय गुप्तचर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी सहसंचालक ऋषीराज सिंह यांची बदली थांबवून पुन्हा आहे त्या जागीच त्यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना पत्राद्वारे विनंती केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली आहे. ते शुक्रवारी मुंबईत दिव्य मराठीशी बोलत होते. केंद्रीय गुप्तचर विभागाचे सहसंचालक ऋषीराज सिंह यांनी आदर्श गृहनिर्माण सोसायटी प्रकरणात अत्यंत कसून चौकशी केली होती.
सीबीआयने आदर्श प्रकरणांत माजी मुख्यमंत्र्यांसह 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर दुसºयाच दिवशी सिंह यांची बदली झाल्याने राज्यात चांगला संदेश जाणार नाही. तसेच सिंह यांच्या जागी आलेल्या अधिकाºयाला काम करण्यात अडचणी आणि राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे, असे मत तावडे यांनी व्यक्त केले. आदर्श प्रकरणांत अनेक नेत्यांची बेनामी मालमत्ता असल्याची माहिती सिंह यांच्याकडे आहे, या प्रकरणामध्ये तीन माजी मुख्यमंत्र्यांची नावे गुंतली आहेत. राज्य सरकारने सीबीआय चौकशीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती, अशी भूमिका घेतल्याने या प्रकरणातील सत्य बाहेर येणार नाही, त्यामुळे सिंह यांची सीबीआयच्या सहसंचालकपदी पुनर्नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली असल्याचे तावडे यांनी सांगितले.
'आदर्श\' तपास करणारे ऋषिराज सिंग यांची बदली
आदर्श घोटाळा : म्हणणे मांडण्यास संरक्षण विभागाला 15 दिवसांची मुदत
आदर्श घोटाळा : सीबीआयकडून अशोक चव्हाणांसह गिडवानींवर आरोपपत्र दाखल
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.