आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Stope The Expensive Marriage In Drought Ajit Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळात शाही पद्धतीने लग्नाचा खर्च नकोच : अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना ठेकेदाराकडून लग्नाच्या जेवणाचा खर्च करून घेतल्याबद्दल अडचणीत आलेल्या नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शुक्रवारी नाराजी व्यक्त केली.

पवारसाहेब आपल्या एकुलत्या एका कन्येचे खासदार सुप्रिया हिचे लग्न साधेपणाने लावू शकतात तर इतर का नाही, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला. त्यामुळेच पवार साहेबोंनी आवाहन केले असून ज्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहेत त्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे ते म्हणाले. तसेच जाधव यांनी ठेकेदाराकडून जेवणाचा खर्च करून घेतल्याबद्दल प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, पवारसाहेब एकदा या विषयावर बोलले आहेत. त्यामुळे हा विषय आता संपला आहे. काही कारवाई करायची की नाही याचा निर्णय साहेबच घेतील, असे त्यांनी सांगितले.

जाधव यांनी मुलांच्या लग्नामध्ये केलेल्या खर्चाची पक्षाने चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे कोकणातील नेते व माजी आमदार रमेश कदम यांनी यावेळी केली. जाधव हे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पैसे आले असून ही बाब तपासून पहावी लागेल. त्यांनी स्वत:च शहा ठेकेदाराने जेवणाचा खर्च उचलल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे शरद पवार यांना पत्र लिहून आपण याची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे कदम म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातर्फे जाधव यांना सावरून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कराडमधील शहा या ठेकेदाराने जेवणाचा खर्च केल्याची कबुली जाधव यांनी स्वत: काल वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली होती. मात्र जेवणाचा 22 लाख रुपयांचा खर्च जाधव या ठेकेदाराला देणार असल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले. शहा हे ठेकेदार असले तरी त्यांचा कॅटरिंगचाही व्यवसाय आहे, असेही ते म्हणाले. राज्यामध्ये दुष्काळ तीव्र होत असताना शाही लग्न समारंभ करून खोटा दिखाऊपणा करणा-या नी राजकारणामध्ये राहू नये, असे थेट वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काल केल्यांतर अडचणीत आलेल्या भास्कर जाधव यांनी माफी मागितली होती.

जाधव यांनी आपण ठेकेदाराकडून जेवणाचा खर्च करवून घेतल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. तशा स्वरुपाच्या माध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्या चुकीच्या असून तसे खरे असल्यास आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, असे ते म्हणाले. राज्याची माफी मागितल्याने हा विषय संपायला हवा होता, असेही ते म्हणाले.