आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळ साठवणुकीच्या मर्यादेत तिपटीने वाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाली मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील चांगले पर्जन्यमान व  उपाययोजना यामुळे यंदा तुरीचे उत्पादन जास्त झाल्याने घाऊक बाजारात तूरडाळीचे भाव किमान हमी भावापेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे मालाला योग्य भाव मिळावा म्हणून डाळींवरील घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकरिता लागू असलेली साठवणूक मर्यादा पुढील तीन महिन्यांसाठी तिपटीने वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
 
चांगल्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढल्याने शासनाने सोयाबीन ५ नोव्हेंबर २०१६ पासून साठा निर्बंधातून वगळले आहे.  तूरीचेही चांगले उत्पादन झाल्याने आणि सध्या बाजारात तूरडाळीच्या किमती हमी भावापेक्षा कमी झाल्याने तूरडाळीच्या साठा मर्यादेत  तिपटीने वाढ करण्यात आली.

सर्वसमान्य जनतेची निकड लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही जीवनावश्यक वस्तू घोषित केल्या आहेत. गेल्या वर्षी १९ आॅक्टोबर २०१६ राेजी वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने डाळी साठवणुकीवर निर्बंध लागू केले होते. 

साठा मर्यादा अशी
नव्या मर्यादेनुसार, महानगरपालिका क्षेत्रासाठी घाऊक व्यापाऱ्यांकरिता १० हजार ५०० क्विंटल तर किरकोळ व्यापाऱ्यांकरिता ६०० क्विंटल, अ-वर्ग नगरपालिका क्षेत्रासाठी घाऊक व्यापाऱ्यांकरिता ७५०० तर किरकोळ व्यापाऱ्यांकरिता ४५० क्विंटल, तर उर्वरित ठिकाणी घाऊक व्यापाऱ्यांकरिता ४५०० तर किरकोळ व्यापाऱ्यांकरिता ४५० क्विंटल साठवणुकीची मर्यादा निश्चित केली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...