आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसोबत पकडला होता हा डॉन, छोटा राजनचा आहे कट्टर वैरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतासाठी मोस्‍ट वॉन्टेड राहिलेला अबू सालेम याला जेव्‍हा पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे अटक करण्‍यात आली होती. तेव्‍हा तो त्‍याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मोनिका बेदी हिच्‍या सोबत होता. 2005 मधील हे प्रकरण आहे. तत्कालीन परराष्ट्र सचिव त्‍यावेळी लिस्‍बन विमानतळावर सालेम याच्‍यावर गुप्‍तपणे लक्ष ठेवून होते. विमानाने उड्डाण घेईपर्यंत ते विमानतळाबाहेर उभे होते. नंतर त्‍यांनी खात्री करून गुप्‍तचर संस्‍थांना फोन करून मिशन फत्‍ते झाल्‍याची माहिती दिली होती.
राजनचा कट्टर दुश्‍मन
सालेमला झालेली अटक आणि भारतात आणण्‍याची प्रक्रिया अत्‍यंत गुप्‍तपणे करण्‍यात आली. माध्‍यमांनाही काही तासानंतर ही बातमी समजली. एकेकाळी दाऊदचा उजवा हात असलेला सालेम छोटा राजनचाही कट्टर दुश्मन आहे. सालेमला पोर्तुगाल सरकारने काही अटींवर भारतात पाठवले होते. त्याला कोणत्‍याही प्रकरणात मृत्‍यूदंडाची शिक्षा देऊ नये अशी अट घालण्‍यात आली होती.
मोनिका आणि सालेमची अशी झाली भेट
पोर्तुगाल पोलिसांनी सालेमला अटक केली तेव्‍हा तो त्‍याची मैत्रीण बॉलीवुड अभिनेत्री मोनिका बेदी सोबत होता. 1998 ला दुबईमध्‍ये त्‍याने कार ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्‍यान स्‍टेज शो कार्यक्रमांमध्‍ये मोनिका बेदी हिच्‍याशी त्‍याची ओळख झाली. पुढे ही मैत्री प्रेम प्रकरणापर्यंत पोहोचली. दोघांमध्‍ये लग्‍न होणार असल्‍याच्‍या बातम्‍याही या पुढे आल्‍या होत्‍या. मोनिकाने काही मुलाखतींमध्‍ये ती सालेमसोबत प्रेम करत असल्‍याचे सांगितले होते. मोनिका बेदी हिला भोपाळमध्‍ये बनावट पासपोर्ट बनवण्‍याप्रकरणी अटक करण्‍यात आले होते.
जन्‍मठेपेची शिक्षा
मुंबईचे बिल्डर प्रदीप जैन यांच्‍या हत्‍येप्रकरणी माफिया डॉन अबू सलेमला विशेष टाडा कोर्टाने जन्‍मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. जैन यांची 7 मार्च 1995 रोजी त्‍यांच्‍या बंगल्‍याबाहेर गोळी मारून हत्‍या करण्‍यात आली होती. सालेम 1993 च्‍या मुंबई बॉम्‍सस्‍फोटातही आरोपी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, मोनिका आणि सालेम यांचे फोटो..
पुढे वाचा, सालेम काय करायचा मुंबईत, कसा आला दाऊदशी संपर्क.. त्‍याची बॉलीवुडमधील दहशत.