आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पेक्षा शक्तिशाली होता बडा राजन, एका ऑटो ड्रायव्‍हरने गोळी मारून केली हत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दोन दशकांपासून मोस्ट वांटेड असलेला राजेंद्र सदाशिव निखाळजे उर्फ छोटा राजन याला इंडोनेशिया पोलिसांनी अटक केली आहे. या आठवड्यात त्‍याला भारतात आनण्‍यात येणार आहे. 20 पेक्षा अधिक हत्‍यांमध्‍ये सहभागी होण्‍याचा त्‍याच्‍यावर आरोप आहे. 70 आणि 80 च्‍या दशकात छोटा राजन चित्रपट तिकीट ब्‍लॅकमध्‍ये विकण्‍याचे काम करत होता. याच वेळी त्‍याची भेट राजन महादेव नायर उर्फ बडा राजन याच्‍यासोबत झाली.
छोटा राजन मानत होता गुरू
गुन्‍हेगारीच्‍या क्षेत्रात छोटा राजनला अंडरवर्ल्‍ड डॉन बनवण्‍याच्‍या प्रवासात बडा राजनचा मोठा वाटा राहिला. या दोघांमध्‍ये घनिष्‍ठ मैत्री झाली. दाऊद आणि बडा राजनचे संबंधही चांगले होते. आज असेही म्‍हटले जाते की, बडा राजन जिवंत असता तर, छोटा राजन आणि दाऊदमध्‍ये वैर निर्माण झाले नसते.
अंडरवर्ल्ड डॉन राजन महादेव नायर, बडा राजन याचे साम्राज्य चेंबूरच्‍या टिळक नगर परिसरात होते. दोन्‍हीही राजन मुंबईच्‍या विक्रोळीमध्‍ये तिकीटांचा काळाबाजार चालवत होते. 1980 च्‍या सुमारास छोटा राजनने एक गँग उभी केली आणि दोन्‍ही राजन दाऊदसाठी काम करून लागले. बडा राजन दाऊदचे जमिनीसंदर्भातील वाद सोडवत होता. बिल्डरांकडून खंडणी घेण्‍याचे कामही त्‍याचे वाढले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून जाणुन घ्‍या...कोणासोबत होते राजनचे वैर.. कोणी ? का? आणि कशी ? केली त्‍याची हत्‍या.. कुठे राजनचा होता वचक, कुठे होता तो लोकप्रिय..