आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या ग्लॅमरस सूनबाई, होत्या रिसेप्शनिस्ट आता सासऱ्यांवर बनवताहेत चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिता ठाकरे यांना घटस्फोट दिल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे मुलगा जयदेव बरोबर वाद झाले होते. - Divya Marathi
स्मिता ठाकरे यांना घटस्फोट दिल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे मुलगा जयदेव बरोबर वाद झाले होते.
मुंबई - चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे त्यांचे दिवंगत सासरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बायोपिक बनवत आहेत. त्यांच्या जीवनाबाबत संपूर्ण जगाला सांगणे गरजेचे आहे, असे स्मिता यांचे म्हणणे आहे. स्मिता यांचा मुलगा राहुल या चित्रपटाचे डायरेक्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. एकेकाळी रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलेल्या ठाकरे कुटुंबाच्या सूनबाई स्मिता ठाकरे यांनी यापूर्वीही अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

कलाकारांची निवड सुरू
- गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात बाळासाहेबांवरील चित्रपटाची घोषणा केली होती. 'साहेब' नावाचा हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये सुरू होत आहे. सध्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड होणार आहे.
- मेरी कोमचे डायरेक्टर उमंग कुमार आणि संदीप सिंग, राशीद सईद आणि स्मिता हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
- स्मिता म्हणाल्या की, बाळासाहेब यांच्याबाबत नेहमीच एक गूढ कायम राहिले आहे. ते कार्यकर्ते आणि कुटुंबासाठीही महान व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या प्रवासात त्यांच्याबरोबर असणे ही गौरवाची बाब आहे.
- मुलाने बाळासाहेबांवर बायोपिक बनवण्याचे आव्हान स्वीकारल्याचा आनंद आहे, असेही स्मिता म्हणाल्या.

जयदेव ठाकरेंशी झाला होता विवाह
- बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा मुलगा जयदेव आणि स्मिता यांचा विवाह झाला होता. स्मिता, जयदेव यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. जयदेव आणि स्मिता यांच्यात आता घटस्फोट झाला आहे.
- जयदेव यांनी तीन विवाह केले आहे. पहिला विवाह जयश्री कालेकर यांच्याशी तर दुसरा स्मिता ठाकरे यांच्याशी. पण दोन्ही विवाह टिकू शकले नाहीत.
- स्मिता यांच्याशी विवाह तुटल्यानंतर जयदेव यांनी तिसरा विवाह केला. त्यानंतर त्यांनी मातोश्री सोडले. मात्र स्मिता ठाकरे मातोश्रीवरच राहत होत्या.
- स्मिता यांना सोडून तिसरा विवाह करणे बाळासाहेबांना आवडले नाही म्हणून त्यांचा जयदेव यांच्याशी दुरावा आला.

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रात मिळाले स्थान
- बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रानुसार मातोश्रीचा तळमजला हा पक्षाच्या कामासाठी राखीव ठेवला आहे.
- पहिला मजला स्मिता ठाकरे आणि जयदेव यांचा मुलगा ऐश्वर्य यांना देण्यात आला आहे.
- मात्र स्मिता आणि जयदेव ठाकरे यांना त्याठिकाणी राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
- या फ्लोरच्या मेंटनन्सचा खर्च स्मिता यांनाच उचलावा लागणार आहे.
- सर्वात वरील मजला बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या नावावर केला आहे.
- तसेच कर्जत आणि भंडारदरा येथील मालमत्ताही उद्धव ठाकरेंच्या नावावर करण्यात आली आहे.

पूर्वी होत्या रिसेप्शनिस्ट
- स्मिता मुंबईच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. तसेच त्या एक ब्युटी पार्लरही चालवत होत्या.
- जयदेव यांच्या पहिल्या जयश्री कालेकर नेहमी त्या ब्युटी पार्लरमध्ये जायच्या. त्याचठिकाणी स्मिता आणि जयदेव यांच्यात ओळख झाली होती.
- त्यानंतर स्मिता यांचे मातोश्रीवर येणे जाणे सुरू झाले. त्यानंतर स्मिता आणि जयदेव यांच्यात जवळीक आली त्यानंतर जयदेव यांनी जयश्री यांना घटस्फोट देऊन स्मिता यांच्याशी विवाह केला.

बॉलीवूड, पेज 3 पार्टीजमध्ये दिसतात
स्मिता यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. सलमान खान पासून अमिताभ बच्चनच्या पार्टीमध्ये त्या असतात. बॉलीवूडच्या अनेक शोमध्येही त्या सहभागी झाल्या आहेत. त्यांचा मुलगा राहूलने नुकताच गर्लफ्रेंड आदितीबरोबर विवाह केला आहे. तर त्यांचा दुसरा मुलगा ऐश्वर्य सध्या शिकत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्मिता यांचे निवडक PHOTOS

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...