आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सभागृहात आमदारांच्‍या टेबलवर का ठेवत नाहीत पेपरवेट, जाणून घ्‍या आताच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्‍ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे झाले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे सभागृहात आमदारांसमोर पेपरवेट का ठेवत नाहीत, याची रंजक माहिती....
का ठेवत नाहीत पेपरवेट ?
> राज्‍याचे महाधिवक्‍ता श्रीहरी अणे यांनी विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करा, असे व्‍यक्‍तव्‍य केल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात अधिवेशनाच्‍या तिसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस गाजला.
> असेच काहीचे वर्ष 1964 मध्‍ये झाले होते.
> त्‍यावेळी फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाचे तत्‍कालीन आमदार तथा विदर्भवीर जाबुवंतराव धोटे यांनी मोठ्या आक्रमकतेने विदर्भावर होत असलेल्‍या अन्‍यायाचा विषय सभागृहात लावून धरला होता.
> त्‍यांना इतर काही सदस्‍यांनी विरोध केला.
> त्‍यावेळी विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी जाबुवंतरावांना खाली बसण्‍याचा आदेश दिला.
> त्‍यावर जाबुवंतराव प्रचंड‍ चिडले आणि त्‍यांनी आपल्‍या टेबलावरचा पेपरवेट उचलून भारदे यांच्‍या दिशेने फेकला.
>जाबुवंतरावांचा नेम चुकल्‍याने अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांना कुठलीही इजा झाली नाही.
> या प्रकारामुळे जाबुवंतराव यांच्‍या विरोधात ठराव पारित करून थेट त्‍यांचे विधानसभा सदसत्‍वच रद्द करण्‍यात आले.
> एवढेच नाही तर तेव्‍हापासून सभागृहातील आमदारांच्‍या टेबलवरील पेपरवेट काढून टाकण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पोटनिवडणुकीत पुन्‍हा जाबुवंतरावच झाले विजयी.... नंतर शपथ घेताना काय म्‍हणाले होते विदर्भवीर... कोण आहेत जाबुवंतराव.... बाळासाहेब ठाकरेंना दिला होता जाबुवंतरावांनी आदेश.... ‘वारे शेर आया शेर..’
बातम्या आणखी आहेत...