आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Hearing In Front Of Human Rights Commission

गरोदर नसतानाही महिलेचा दोन वेळा गर्भपात, मानवाधिकार आयोगाने ऐकल्या व्यथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर, मी कधी गरोदरच नव्हते. परंतु दोन वेळा गरोदर असल्याचे सांगून माझा गर्भपात करण्यात आला. हे सगळे पैशासाठी करण्यात आले. नंतर मी दुसऱ्या डॉक्टरकडून रिपोर्ट तपासले असता हा लुटीचा प्रकार उघडकीस आला. राजस्थानातील झुंझून येथील रहिवासी येथील रंजन शर्मा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार अायोगासमोर ही व्यथा मांडली. परंतु ही केवळ त्यांचीच व्यथा नाही. तर राजस्थानसह महाराष्ट्र व गुजरातमधील १०६ रुग्णांची सुनावणी मुंबईत आयोगाच्या सदस्यांसमोर झाली.

मुंबईत आयोगासमोर खासगी व सरकारी रुग्णालयांच्या विरोधातील तक्रारींची पहिल्यांदाच सुनावणी झाली. त्यात तिन्ही राज्यातील शेकडो रुग्ण आले होते. त्या वेळी "भास्कर'च्या प्रतिनिधीने अनेक रुग्णांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्या वेळी देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांची धक्कादायक व काळी बाजू समोर आली. त्यांच्या व्यथा इतक्या विदारक होत्या की, त्यामुळे हृदयाला अक्षरश: पीळ पडत होता.

रुग्णालयात गरज नसताना गर्भपात करण्यात आले तशी आवश्यकता नसता काहीजणांना भूल देण्यात आली. त्यामुळे रुग्णांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. पुण्याच्या शीतल राजू या महिलेने मांडल्या व्यथांनी तर आयोगाचे सदस्यही हबकून गेले. शीतल राजू या महिलेने उपजिल्हा रुग्णालयात गरोदरपणाची चाचणी केली होती. त्यात तिच्या रक्ताचे नमुने एचआयव्ही पॉजिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयाने तिचे नमुने हायर सेंटरवर तपासणीसाठीपाठवले. त्यांनीही तिला पॉजिटीव्ह ठरवले. नंतर तिच्यावर एचआयव्ही पॉजिटिव्हनुसारच उपचार करण्यात आले. डिलिव्हरीच्यावेळी तिला इतर रुग्णांपासून वेगळे परंतु चक्क जमिनीवर झोपवण्यात आले. तेथे तिने मुलला जन्म दिला. नवजात बाळावरही एचआयव्ही प्रतिबंधक उपचार सुरू करण्यात आले. नंतर तिने खासगी रुग्णालयात तपासणी केली असता ती एचआयव्ही निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. अशा गंभीर व धक्कादायक तक्रारी ऐकून आयोगाचे राज्य सरकारचे प्रतिनिधीही चक्रावले. ते काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. आयोगाने काही प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे तसेच काहींमध्ये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुनावणीस्थळीच जारी केले आहेत.

भूल दिल्याने आले आयुष्यभराचे अपंगत्व
२५ वर्षीय राघवेंद्र राव स्पाइना बायफिडा आजाराने ग्रस्त होते. लघवीची समस्या असल्याने मुंबईच्या बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सोनोग्राफी, एमआरआय व इतर सुविधा नव्हत्या. राघवेंद्रच्या आई कमला यांनी आयोगाला सांगितले की, हॉस्पिटलच्या सर्जननी एमआरआय व सोनोग्राफी न करताच शस्त्रक्रिया केली. त्यात स्पाइनल अॅनेस्थिसिया लंबर्ड पंक्चर दाखवण्यात आली. या आजारात भूल देण्यावर निर्बंध आहेत. परंतु राघवेंद्रला भूल दिल्यामुळे त्याच्या दोन्ही पायांच्या हालचाली बंद झाल्या आहेत. शस्त्रक्रियेच्या आधी मुलगा काठी घेऊन चालत होता. आज तो व्हिल चेअरवर आहे.
निर्णय : प्रकरण जुने असल्याने अद्याप कोणताही निर्णय नाही. परंतु या केसचा अभ्यास सुरू आहे.

गराेदर नसतानाही गरोदर दाखवून गर्भपात
झुंजून येथील रंजना शर्मा यांना मूल हवे होते. त्या पिलानी येथील डॉक्ट अनिता भुताडियांकडे कगेल्या. डॉक्टरांनी ती दोन वेळा गरोदर असल्याचे दाखवले. तसेच रिपोर्ट दिले. दोन्ही वेळा मूल अशक्त असल्याचे सांगून गर्भपात करविला. नंतर महिला व तिच्या पतीला संशय आल्यावर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडून तपासणी केली. त्यातून रंजना गर्भवती नसल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी उपचाराच्या नावावर लाखो रुपये उकळल्याचा रंजनाचा आरोप आहे.
निर्णय: अायोगाने प्रकरणाची वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत तपासणीचे तसेच संबंधित डॉक्टरच्या प्रॅक्टीसच्या तपासणीचे आदेश देत सहा महिन्यांत अहवाल मागितला आहे.