आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

300 कोटींची मालकीण तुरुंगात करणार झाडझूड आणि धुणी-भांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुमारे 300 कोटींची मालकीण आणि फोर्ब्सच्या 100 प्रभावी महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या इंद्राणीने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, तिला असे दिवसही पाहावे लागतील. एखाद्या महालासारख्या एअरकंडीशनर घरात राहणारी इंद्राणी आता मुंबईच्या भायखळा महिला तुरुंगातील कैदी बनली आहे. याठिकाणी तिला ऐशोआराम सोडून मच्छर, माशा, ढेकून असलेल्या कोठडीमध्ये राहावे लागणार आहे. तिला 14 दिवस या तुरुंगात राहावे लागणार आहे. सोमवारी या प्रकरणातील तिन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपली. न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी आणि तिचा ड्रायव्हर श्यामवीर रायला तुरुंगात पाठवले आहे. तर तिसरा आरोप संजीव खन्नाला घेऊन पोलिस चौकशीसाठी कोलकात्याला गेले आहेत.

शिना मर्डर केसची मुख्य आरोपी तिची आई इंद्राणी हिला सुरुवातीपासूनच ऐशोआराम असलेले जीवन हवे होते. त्यासाठीच सर्व नातेसंबंध पायाशी तुडवत तिने कोणत्याही स्थितीत मोठं व्हायचं म्हणून हा निर्णय घेतला. गेल्या एका महिन्यापासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इंद्रानीबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. असामच्या गुवाहाटीपासून ते मुंबईच्या हाय सोसायटीपर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत आश्चर्यजनक असा राहिलेला आहे. अखेर तिने तिला हवे ते अगदी कमी कालावधीत मिळवलेही. आता ती 14 दिवस तुरुंगात राहणार आहे. तिला याठिकाणी कैद्यांबरोबर ठेवण्यात आले आहे. जेल मॅन्युअलनुसार तिचे डेली रुटीन मालकीनबाईसारखे नाही तर कैद्यांप्रमाणेच असणार आहे. तिला तुरुंगात झाडू मारावा लागेल, तर टॉयलेटला जाण्यासाठी रांग लावाली लागेल. संशयित आरोपींना करावी लागणारी कामे तिला करावी लागणार आहे.
पुढे वाचा, कसे असेल इंद्राणीचे रुटीन...