आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जांबुवंतराव म्‍हणाले सिगारेट विझवा, बाळासाहेबांनी विचारले हा आदेश की विनंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या बऱ्याचवेळा एकत्र बैठका होत असत. धोटे हे आपला फॉरवर्ड ब्लॉक पक्ष सोडून शिवसैनिक झाले होते. बाळासाहेबांना पाईपमध्ये तंबाखू पेरून धुराडे सोडण्याचा भारी शौक होता. तर, धोटे हे तंबाखू-सिगारेटचे प्रचंड विरोधी. धोटे यांना आपल्या बाजूला बसून कोणी सिगारेट ओढत आहे हे क्षणभरही सहन होत नाही. माझ्या बाजूला बसायचे असेल तर सिगारेट विझवा, अशी सूचना जांबुवंतराव हमखास करतात, असे प्रसंग अनेकांना ज्ञात आहेत. जांबुवंतराव धोटे यांनी एकदा बाळासाहेबांना ‘सिगारेट विझवा’ असे स्पष्ट सांगितले आणि बाळासाहेबांनी लगेच सिगारेट विझविली. धोटे यांनी हा प्रसंग सांगितला होता. 1995 साली दारव्‍हा (जिल्‍हा - यवतमाळ) येथे निवडणूक कार्यक्रमात पत्रकारांनी या प्रसंगाच्‍या सत्‍यतेबाबत बाळासाहेब ठाकरे यांना विचारणा केली. तेव्‍हा बाळासाहेब म्‍हणाले होते, धोटे यांनी अर्धसत्य सांगितले आहे. पूर्ण सत्य असे आहे की, धोटे यांना तुमची विनंती आहे की आदेश आहे ? असे मी उलट विचारले होते. तेव्हा धोटे यांनी विनंती असल्याचे नम्रपणे सांगितले. धोटेंनी आदेश करून पाहावा, असेही आपण धोटे यांना म्हटले होते. पण धोटे ते समजूतदार असल्याने काही बोलले नाहीत. नंतर मी लगेच सिगारेट विझवली, असेही बाळासाहेब म्‍हणाले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, बाळासाहेबांचे सिगार ओढतानाचे फोटो..
जाणुन घ्‍या, बाळासाहेबांना कशी लागली सिगारची सवय, त्‍यांचा आवडता ब्रँड कोणता..