आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्न कॉमेडी घेऊन येतोय मराठी दिग्दर्शक, हिंदीत वाढतेय मराठी लाेकांची मक्तेदारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘प्रत्येक माणसाच्या मनात द्वयर्थी संवाद वा अश्लील फोटोंबाबत एक आकर्षण असते. सार्वजनिक स्वरूपात कोणी यावर बोलत नसले तरी एकांतात याचा आनंद घेतला जातो. पडद्यावर जेव्हा हेच त्याला पाहायला मिळते तेव्हा तो त्याचा आनंद घेतो. यामुळे दादा कोंडके यांचे चित्रपट गाजले आणि आता "एक चावट संध्याकाळ'सारखे नाटकही चालत आहे. माझा चित्रपटही याच श्रेणीतील असून तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल’, असे मत "क्या कुल है हम ३'चा तरुण दिग्दर्शक उमेश घाडगे याने "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.
देशात चित्रपटसृष्टीची सुरुवात मराठी माणसाने केली असली तरी पंजाबी, मुस्लिम आणि गुजराती व्यापाऱ्यांनी यावर ताबा मिळवला आणि मराठी माणूस फक्त नावाला हिंदी चित्रपटसृष्टीत काम करू लागला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. अनेक मराठी तरुण वेगवेगळ्या बॅनरचे हिंदी चित्रपट घेऊन येत असून आता प्रथमच पोर्न कॉमेडी चित्रपट घेऊन उमेश घाडगे येत आहे. सिडनेहॅम कॉलेजमधून बी. कॉम. झालेल्या उमेशने २००८ मध्ये दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याकडे उमेदवारी सुरू केली आणि आज त्यांच्यामुळेच उमेशला एकता कपूरद्वारे निर्मित चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली आहे.
उमेश सांगतो, "मै तेरा हीरो' चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली. मी डेव्हिड धवनचा सहायक असल्याने बालाजीच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर गौरी साठे यांच्याशी ओळख झाली. एक दिवस त्यांनी मला बोलावले आणि "क्या कुल'च्या दिग्दर्शनाबाबत विचारले. अर्थात त्यापूर्वी त्यांनी डेव्हिड धवनशी चर्चाही केली होती. बालाजी आणि धवन यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. अशा चित्रपटांमुळे अश्लीलता वाढेल असे वाटत नाही का? या प्रश्नावर उमेश म्हणाला, ‘अश्लीलता वाढत नाही किंवा कमीही होत नाही. प्रत्येकाला त्याचा आनंद घ्यायचा असतो. पूर्वी बी आणि सी ग्रेडचे निर्माते असे चित्रपट तयार करत. आता मोठे बॅनर करत आहेत, कारण याचे मार्केट मोठे आहे. मोठे बॅनर चांगल्या प्रकारे सादरीकरण करत असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक असे चित्रपट पाहू लागले आहेत. आपल्याकडे पूर्वी बबन प्रभू, दिलीप प्रभावळकर यांचे फार्स असायचे, जी सिच्युएशनल कॉमेडी असायची आणि प्रेक्षकांनाही आवडायची. अॅडल्ट कॉमेडी हा त्याचाच प्रकार आहे. या चित्रपटातील कलाकार पोर्न स्टार दाखवले असल्याने हा चित्रपट देशातील पहिला पोर्न कॉम चित्रपट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पोर्न कॉम हा शब्द हॉलीवूडवरून आल्याचेही उमेशने सांगितले.

हिंदीत दिसणारे मराठी दिग्दर्शक
परेश मोकाशी भयकथा "हीर रांझा की नावाटा' हा चित्रपट घेऊन येत असून उमेश कुलकर्णी आणि रवी जाधवही हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत.