आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाला गोळ्या घालणाऱ्या दरोडेखोराला घरात घुसून ठोकले होते, वाचा तडफदार IPS विश्वास नांगरे पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वास नांगरे पाटील हे नावच सर्वकाही सांगून जाते. महाराष्ट्रातील तरुणाईचे आदर्श आणि एक कर्तव्यतत्पर पोलिस अधिकारी म्हणजे विश्वास नांगरे पाटील. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील हे विविध शाळा, महाविद्यालयाच्या कार्यक्रमांमधून तरुणाईशी संवाद साधत असतात. पण त्याला मर्यादा येत असल्याने आणि अधिकाधिक मुलांना प्रोत्साहीत करता यावे या उद्देशाने नांगरे पाटील यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि अनुभव या माध्यमातून तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी एक पुस्तक लिहिले आहे.

मन मे है विश्वास असे या पुस्तकाचे नाव आहे. अवघ्या 20 दिवसांत तीन पुस्तकाच्या तीन आवृत्त्या आल्याने पुस्तक विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादामुळे सगळीकडे सध्या याची चर्चा होत आहे. या पुस्तकाच्या यशानंतर एका टिव्ही चॅनलने नांगरे पाटील यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक घटना किस्से सर्वांसमोर मांडले. रोजचे जीवन जगताना अभ्यासाची तयारी कशी करावी याचा ताळमेळ कसा घालावा याचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील मुलांना व्हावे यासाठी हे पुस्तक लिहिले आहे, असे नांगरे पाटील यांनी सांगितले.
18 वर्षे पोलिस सेवेत आहे. अनेक चढउतार मी या काळात पाहिले. ३ रेव्ह पार्ट्यांवर केलेली रेड आणि त्यानंतर ड्रग माफियांशी आलेला संबंध त्यातून समोर आलेली व्यसनाधीनता. बलात्काराच्या केसेस हँडल करताना तरुणी, महिलांचे प्रश्न, 26/11 च्या रात्री मृत्यूचे आकर्षण कसे निर्माण झाले याबरोबर स्पर्धा परीक्षांमधील मुलांचे फ्रस्ट्रेशन हे सर्व डोक्यात होते आणि ते मी रोज लिहित होतो. त्यातून पुस्तक समोर आले, असे नांगरे पाटील म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा,
सातवीत असताना भुताच्या तालमीत राहण्याची राहण्याची पैज..
दरोडेखोर म्हणायचा नांगऱ्या..
काय म्हणाले, पोलिसांच्या सुटलेल्या पोटाबाबत..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...