आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याण-डाेंबिवली मनपाचा धडा : ‘बळ’ वाढलेही, पण स्वबळ सत्तेला अपुरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण/कोल्हापूर/औरंगाबाद - युती व आघाडीतील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या मित्रपक्षांनी परस्परांविरुद्ध शड्डू ठोकल्याने प्रत्येकाचे बळ वाढले असले तरी कल्याण-डोंबिवली मनपाची सत्ता स्वबळावर काबीज करण्याचे स्वप्न मात्र भंगले.
शिवसेना-भाजपने युती तोडून स्वबळावर सत्तेत येण्याची भाषा केली होती. पण मतदारांनी दोघांनाही स्वबळावर सत्ता दिली नाही. शिवसेना ५२ जागा जिंकून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी त्या पक्षाला ९ जागा कमी पडल्या. भाजपने ९ जागांवरून ४२ जागांपर्यंत भरारी घेतली असली तरी स्वबळाची सत्ता मिळवता आली नाहीच. मनसेची तर २७ जागांवरून या वेळी ९ जागांवर घसरण झाली. काँग्रेसला ४ तर आणि राष्ट्रवादीला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले.
कोल्हापुरात त्रांगडे
कोल्हापूर मनपा निवडणुकीतही कोणत्याच पक्षाला स्वबळावर सत्ता मिळणार नाही, हे स्पष्ट झाले. ८१ सदस्यांच्या सभागृहात २७ जागा घेऊन काँग्रेस मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीला ३२, शिवसेनेला ४ तर इतरांना ३ जागांवर विजय मिळाला. तेथे ताराराणी आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.