आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जरा गांभीर्याने घ्या! दुसर्‍यांचा पाळणा हलविण्यापेक्षा स्वत:चा पाळणा हलवा\'-शिवसेनेचे खडे बोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगीं’चे ‘अन्नपूर्णा कॅण्टीन’ किंवा जयललितांनी सुरू केलेले ‘अम्मा कॅण्टीन’ हा शिवसेनेच्याच वडापाव योजनेचा पुढील आविष्कार आहे. धुळीस मिळालेले राज्य वर उचलण्याची योगी आदित्यनाथ यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे व ते कामाच्या बाबतीत कमालीचे गंभीर आहेत. योगींनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण आमचे सरकार ‘योगी’ मॉडेलचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. दुसऱ्यांचा पाळणा हलविण्यापेक्षा स्वतःचा पाळणा हलवून विकासाचे पोर कधी केकाटणार, हे जरा गांभीर्याने घ्या. नाहीतर महाराष्ट्राचे देशाच्या नकाशावरील गांभीर्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

मुख्यमंत्रीपदाची वगैरे शपथ ‘गंभीर’तापूर्वक घेण्याची परंपरा आहे. पण राज्यकर्ते खुर्च्यांवर बसल्यावर किती गांभीर्याने काम करतात हा प्रश्नच आहे. नुसते चेहऱ्यांवर गांभीर्याचा मुखवटा लावून चालत नाही, तर तो गंभीर रस कृतीत उतरावा लागतो. नाहीतर त्याची अवस्था महाराष्ट्र सरकारसारखी होते, अशी घणाघाती टीका केली आहे.

गांभीर्याचा ‘तुटवडा’ स्वतःकडे असलेले लोकच इतरांच्या गांभीर्याचा दुःस्वास करीत असतात. पण महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून थोडे गांभीर्य उधारीवर घ्यायला हवे, असा सल्ला देत उद्धव ठाकरे यांनी योगी महाराजांच्या राज्यकारभारची प्रशंसा केली आहे. राज्य करणे म्हणजे गोरखपूरचा मठ चालवण्याइतके सोपे आहे काय या सर्व शंकांची जळमटे दूर करून योगींनी कामांचा धुमधडाकाच लावला आहे. उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा.... आणखी काय म्हटले आहे अग्रलेखात? ज्याला पोटाची भाषा समजते व पोटाचे प्रश्न जो सोडवतो तोच लोकप्रिय राज्यकर्ता ठरतो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...