आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे काय म्‍हणाले होते गाडगे महाराज की, डॉ.बाबासाहेबांच्या डोळ्यात तरळले होते अश्रु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अनाथ, अपंगांचे सेवेकरी संत गाडगे महाराजांनी गावोगावी पायी फिरून दिवसा स्‍वच्‍छता तर रात्री कीर्तनाच्‍या माध्‍यमातून लोकांची मने स्‍वच्‍छ केली. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अच्छतेच्‍या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेल्या गाडगे महाराजांच्‍या आयुष्‍यात अनेक खडतर प्रसंग आले होते. आज आम्ही आपल्यासाठी गाडगे महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची एक हदयस्‍पर्षी आठवण घेऊन आलो आहे.

 

गाडगे महाराज आणि बाबासाहेबांची भेट

14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.
गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

 

डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

 

पुढील स्‍लाइड्सवर पाहा दुर्मिळ फोटोंसह अशाच काही खास आठवणी...

बातम्या आणखी आहेत...