आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याने केले मुंबईमध्‍ये 41 खून, दहशतीमुळे रस्‍त्यावर राहत होता शुकशुकाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुमारे 50 वर्षांपुर्वी 41 हत्‍या करून मुंबईमध्‍ये एका सिरीयल किलरने दहशत पसरवली होती. रमन राघव असे त्‍याचे नाव. 60 च्‍या दशकात रमन राघवने सलग तीन वर्ष लोकांच्‍या हत्‍या केल्‍या. त्‍यामुळे त्‍याच्‍या नावाने शहरात थरकाप उडत होता. राघवने ज्‍या लोकांची हत्‍या केली ते उत्तर उपनगर परिसरातील गरीब, फुटपाथवर झोपणारे होते. या 41 जणांमध्‍ये पुरूष, महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.
अफवांचे पेव फुटले होते
राघव गरीब लोकांच्‍या का हत्‍या होतात. त्‍यांच्‍याकडे चोरण्‍यासारखे किंवा हिसकावण्‍यासारखे काही नाही. झोपडपट्टी, फुटपाथवरच या हत्‍या का होतात. या प्रश्‍नाने मुंबईकरांसर पोलिसांनाही बेजार केले होते. त्‍याच काळात विविध अफवांचे पेव फुटले होते.

असा करायचा हत्‍या
सिरीयल किलर रमन राघव हा लोक झोपेत असताना त्‍यांची हत्‍या करून फरार होत असे. त्‍याने केलेल्‍या हत्‍यांमध्‍ये झोपडपट्टीमध्‍ये राहणारे, फुटपाथवर झोपणारे लोक होते. डोके किंवा नाजुक अवयवांवर तो प्राणघातक हल्‍ला करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. 1990 मध्‍ये रमाकांत कुलकर्णी यांच्‍याकडे या प्रकरणाचा तपास होता. ते महाराष्‍ट्र पोलिसांचे प्रमुख होते. त्‍यांनी त्‍यांच्‍या दोन पुस्‍तकांमध्‍ये हे प्रकरण सविस्‍तर मांडले आहे. त्‍यानी लिहीले की, “या हत्‍यांमागे कोणताही विशेष हेतू नव्‍हता. अत्‍यंत किरकोळ गोष्‍टी साध्‍य करण्‍यासाठी त्‍याने या हत्‍या केल्‍या होत्‍या.”
पुढील स्‍लाइड्सवर वाचा लोक म्‍हणत, तो मांजर आणि पोपटाच्‍या रूपात येऊन खून करतो..