आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Shiv Sena Supremo Balasaheb Thackeray

बाळासाहेबांच्‍या जेवणात निघाले होते \'विश बोन\', म्‍हणाले- महाराष्ट्राचा राजा व्हायला आवडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मध्य प्रदेशातील इंदूर येथील देवास शहराशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विशेष जवळीक होती. ही गोष्‍ट आहे 1957 मधील, तेव्‍हा इंदूरवरून काही लोक बाळासाहेब ठाकरे आणि त्‍यांच्‍या वडिलांना भेटण्‍यासाठी मुंबईला आले होते. बाळासाहेब ठाकरे त्‍यांना दादरमधील शेट्टी हॉटेलात जेवणासाठी घेऊन गेले. सर्व लोक चिकन खात होते. तेवढ्यात बाळासाहेब ठाकरे यांच्‍या प्‍लेटमध्‍ये 'विश बोन' निघाले.

प्‍लेटमध्‍ये विश बोन निघणे म्‍हणजे भाग्‍याचे लक्षण मानले जाते. बाळासाहेबांनी विश बोन हाती घेतले आणि त्‍यांच्‍या मित्रांना दाखवले. तेव्‍हा ते म्‍हणाले, "धिस इज कॉल्ड विश बोन अॅन्‍ड आय विश, मी महाराष्ट्राचा राजा बनावे." संपूर्ण महाराष्‍ट्राच्‍या हृदयात बाळासाहेबांविषयी आदराची भावना होती. नुकत्‍याच झालेल्‍या पुण्‍यतिथीला त्‍यांच्‍या विचारांना उजाळा देण्‍यात आला. त्‍यानिमित्‍ताने समोर आलेला हा प्रसंग.
बाळासाहेब कधी इंदूरला गेले नाहीत मात्र तेथील लोकांच्‍या ते नेहमी संपर्कात होते. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे मध्य प्रदेशातील देवासमध्‍ये शिक्षणासाठी होते. देवासच्‍या व्‍हिक्टोरिया हायस्कूलमध्‍ये ते दोन वर्ष शिकलेले आहेत. देवासचे राजघराणे प्रबोधनकारांना दत्‍तकही घेणार होते. मध्‍यप्रदेशातील लोकांना मुंबईमध्‍ये त्‍यांनी हा प्रसंग सांगितला होता.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बाळासाहेब ठाकरे यांच्‍या काही खास बाबी..