आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलढण्याची मैत्री अशी बनली बाल साहित्यिक, मुख्य मंडपात झाले पुस्तक प्रकाशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाचनाची गोडी असली तर कधी तरी अवचित अशी भेट मिळते. सहावीत असलेल्या बुलढण्याच्या मैत्री लांजेवारला पण अशीच छान भेट मिळाली. पुस्तकाच्या वाचनाच्या गोडीतून तिला संधी मिळाली आणि तिने त्या संधीचा अशा प्रकारे वापर केला की तिचे स्वतःचे एक पुस्तक तयार झाले. या पुस्तकामुळे 90 व्या साहित्य संमेलनात मैत्री ही बाल साहित्यिक ठरली. 

आबा महाजन यांचे हिप हिप हुर्रे पुस्तक मैत्रीला खूप आवडले. तिने न राहून आबाकाकाना फोन करून पुस्तक खुप आवडल्याचे सांगितले. त्यावर आबा म्हणाले बेटा मी अशी १७ पुस्तके लिहिली आहेत. तुला पाठवू का? तू वाच आणि अभिप्राय दे. दोन दिवस थांबून मैत्रीने  होकार कळवला. घरी पुस्तके आली. मग मैत्रीने ही सर्व पुस्तके आपल्या भारत विद्यालयातील  मैत्रिणींना दिली व त्यावर आपले अभिप्राय लिहून द्यायला सांगितले. लिहून दिलेले सगळे अभिप्रायांचे मैत्रीने आपल्या शब्दात संपादन केले. ही खूपच अभिनव गोष्ट होती. कारण आबा महाजन यांनी व जळगावच्या अथर्व प्रकाशन यांनी त्याचे थेट पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात करण्यात आले आणि मैत्री ही बाल साहित्यिक ठरली. 
 
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित PHOTO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...