आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी, बीअर, चिक्की अन् चप्पल.. या वादांमुळे अडचणीत आल्या पंकजा मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडे. महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या. मुंडे साहेबांकडूनच त्यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले. पण मुंडे साहेबांप्रमाणे वादांपासून दूर राहणे मात्र त्यांना जमत नसल्याचे दिसते आहे. दुष्काळाच्या दौऱ्यावर असताना सेल्फी घेऊन ते पोस्ट केल्याने पंकजा यांनी एक नवा वाद ओढवून घेतला आहे. या सेल्फीमुळे पंकजा मुंडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असल्याचे दिसते आहे.

राज्यात भाजपच्या नेतृत्त्वात युतीची सत्ता येऊन सुमारे दीड वर्षाचा काळ लोटत आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे महत्त्वाचे असे ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण या खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पण मंत्रिपदाच्या या काळात अनेक वादांनी पंकजा मुंडे चर्चेत राहिल्या आहेत. विरोधकांची करडी नजरही पंकजा मुंडे यांच्या कामावर होती. पण पंकजा यांचे वाद केवळ त्यांच्या खात्याशी किंवा कामाशी संबंधित नाही, तर काही वाद हे त्यांच्या वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळेही निर्माण झाले आहेत. गोपीनाथ मुंडेंचे पाठीशी असल्याने पंकजा मुंडेंवर देशभरातील मीडियाची नजर असते, त्यामुळे त्यांचे वाद अगदी वेगाने माध्यमांमध्ये झळकत असतात. नुकत्याच झालेल्या सेल्फी वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित वादांवर आपण एक नजर टाकणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कर्मचाऱ्याने चप्पल उचलल्यानंतर काय म्हणाल्या होत्या पंकजा.. यासह त्यांच्याशी संबंधित विविध वाद..