आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About The Statement Of Alone Serviver Of Thane Familicide Case

हातात रक्ताने माखलेली सुरी घेऊन हसनैन बहिणीला म्हणाला होता, 'अब तेरी बारी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाण्यातील संपूर्ण कुटुंबाची हत्या करणा-या हसनैन वरेकरने असे निर्घृण कृत्य का केले असावे याचा सुगावा लावणे पोलिसांना कठीण होत चालले आहे. हसनैनबाबत त्याच्या नातेवाईकांची मते आणि रोज समोर येणारी माहिती यामुळे पोलिसांना या प्रकरणाच्या विविध पैलुंचा शोध घ्यावा लागत आहे.
दरम्यान हसनैनच्या हल्ल्यातून बचावलेली त्याचे एकमेव बहीण सबिया हिने दिलेल्या जबाबातूनही अत्यंत मन हेलावणारी अशी माहिती समोर आली आहे. सबियाने शरबत प्यायली नव्हती त्यामुळे ती पूर्णपणे गुंगीत नव्हती. पोलिसांनाही सबियाचा जबाब ऐकूण धक्का बसला. कारण ही संपूर्ण घटनाच हेलावून सोडणारी अशी होती.

सबियाने पोलिसांना सांगितले की, रात्री तीनच्या सुमारास तिला काहीतरी आवाज ऐकू आल्याने ती जागी झाले. घरात अंधार होता. पण त्यातही येणाऱ्या प्रकाशामध्ये तिने हसनैन एकापाठोपाठ एक सर्वांना मारत असल्याचे तिने पाहिले. हसनैन जेव्हा सबियाला मारण्यासाठी तिच्याकडे निघाला तेव्हा त्याच्या हातामध्ये रक्ताने माखलेला चाकू होता.
सबिया म्हणाली, तो ओरडत होता की, 'मी सगळ्यांना मारले आहे आणि आता तुझी बारी आहे'. पण सुदैवाने काही वाईट घडले नाही. जेव्हा हसनैन सबियाला मारण्यासाठी तिच्या जवळ आला, त्यावेळी तिने त्याला दाराबाहेर ढकलले. त्यामुळे हसनैनचा वार चुकला आणि तिच्या डाव्या हातावर जखम झाली.

सबियाने स्वतःला खोलीत डांबून घेतले. त्यानंतर शेजाऱ्यांना आवाज देऊन तिने लोकांना गोळा केले. लोकांनी धाव घेतली आणि तिला सोडवून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यानच्या काळात ती बेशुद्ध झाली होती. नंतर शुद्धीत आल्यानंतर तिला हसनैने स्वतःदेखिल आत्महत्या केली याबाबत माहिती मिळाली.

दरम्यान, वरेकर कुटुंबाच्या एका नीकटवर्तीयाने पीटीआयशी बोलताना सांगितले की, सबियाने जीवंत राहून या घटनेबाबत सर्वांना सांगावे अशी अल्लाहची मर्जी होती. त्यामुळेच शैतानाने तिला मारले नाही.

पुढील स्लाइड्सवर ग्राफिक्सद्वारे जाणून घ्या या निर्घृण हत्याकांडाविषयी...