आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Dharavi Slum, Turn Over 10 Thousand Crores

एकेकाळी आशियाची सर्वात गलिच्छ वस्ती, आज 10 हजार कोटींची उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: धारावी 217 हेक्टर क्षेत्रफळावर पसरली आहे. येथे 22 हजार छोटी व्यावसायिक व्यवसा य करत आहेत. - Divya Marathi
फाइल फोटो: धारावी 217 हेक्टर क्षेत्रफळावर पसरली आहे. येथे 22 हजार छोटी व्यावसायिक व्यवसा य करत आहेत.
मुंबईचे सर्वात वेगात वाढणारे व्यापारी केंद्र मुंबई-कुर्ला कॉम्प्लेक्सपासून धारावी पाच किमी अंतरावर आहे. पुढे पुढे जात असताना निळा चकाकता साइन बोर्ड दृष्टीस पडतो, तेव्हा या मायानगरीच्या वेगळ्याच भूगोल आणि वर्तमानाची ओळख होते. ही आहे आशियातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात दुसरी मोठी झोपडपट्टी धारावी. इथे स्वागताऐवजी तुमचा सामना होतो तो वास्तव, जिद्द आणि चिकाटीशी. धारावी म्हणजे टोळी युद्ध, गुंडगिरी, गुन्हेगारी पायाभूत सुविधांचा अभाव असणारी महाकाय वस्ती, असे चित्र मनात असेल तर ते तुम्ही काढून टाका. जगण्याच्या धडपडीने धारावीने कात टाकली असून काळाच्या पुढे सरसावली आहे.
सध्या सकाळचे नऊ वाजलेत. डिझेलचा धूर आणि गर्दीचे धक्के खात मी माहिम स्थानकामार्गे धारावीच्या गल्ल्यांकडे मोर्चा वळवत आहे. माहिम आणि सायन धारावीच्या दोन्ही बाजूस रेल्वेस्थानक आहे. इथे जवळपास लाख लोकांची रोज धारावीत ये-जा असते. खरे सांगतो, गर्दीच्या या जंगलात घुसण्यास धाडस धैर्य लागते. ही खरोखरच जिद्दी लोकांची वसाहत आहे. मुंबईप्रमाणेच धारावीही कामाच्या मागे धावपळ करणारे ठिकाण आहे. १८८२ मध्ये ब्रिटिश राजवटीत कामगार वर्गाला स्वस्तात जागा उपलब्ध करून देण्यासाठी वसाहत स्थापन करण्यात आली होती. अरुंद गल्ल्यांतून वाट काढत डोळे संशोधक वृत्तीतून भिरभिरतात तेव्हा तुम्ही तेथील आकर्षणात अडकून पडता. येथे उद्योग विस्तारत आहेत. येथील आर्थिक उलाढाल एक-दोन नव्हे, तर चक्क दहा हजार कोटींची आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली. याचा अर्थ येथील प्रत्येक गल्लीत मेक इन इंडिया आज नव्हे, तर वर्षानुवर्षांपासून वसले आहे. सकाळचे ११.०० वाजले. देशात जानेवारीत सर्वात जास्त थंडी असते. मात्र, धारावीचे स्वत:चे हवामान आहे. हवामान-ऋतू दिनदर्शिकेच्या पानांवरून मागे-पुढे सरकतात. इथे बदलणारी गोष्ट म्हणजे काम आहे. आता मी पुढे जातोय. सनाउल्लाह कंपाउंड, बनवारी, बप्पन किंवा नौरंग कंपाउंड या येथील प्रसिद्ध गल्ल्या. आफ्रिकेतील वनांप्रमाणेच येथे ऊन जमिनीचा स्पर्श करत नाही. त्यामुळे इथे भरमसाट जैवविविधता असून व्यावसायिक कौशल्यही आहे. काही उदाहरणे पाहा. सनाउल्लाह कंपाउंड ३०० चौ. फूट लांबी-रुंदी २० फूट उंचीची पाच मजली झोपडी आहे. पाहताक्षणी ती कधीही कोसळू शकते असे वाटते. मात्र, आतमधील स्थिती एकदम निराळी. पहिल्या मजल्यावर जगप्रसिद्ध किलर कंपनीची डेनिम जीन्स शिवली जात आहे.
पुढे वाचा.. ४०० व्यावसायिकांचीई-काॅमर्स पोर्टल स्नॅपडीलमध्ये नोंदणी, तीन अग्निकांड, धारावी उभी राहिली