आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Martyrdom Officers In 26 November Terrorist Attack In Mumbai

26/11: या \'हिरो\'मुळे भारताला मिळाला होता 26/11चा सर्वात मोठा पुरावा \'कसाब\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद तुकाराम ओंबाळेंच्या प्रतिमेला सल्यूट ठोकताना पोलिस कर्मचारी - Divya Marathi
शहीद तुकाराम ओंबाळेंच्या प्रतिमेला सल्यूट ठोकताना पोलिस कर्मचारी
मुंबई- मुंबईवरील हल्ल्याला आज (गुरुवार) सात वर्षे पूर्ण होत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरून गेली होती. यात 166 लोक मारले गेले तर 308 लोक जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता. तर, या हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. मात्र, शहीद होता होता मुंबई पोलिस दलातील 8 दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले होते तर तुकाराम ओंबाळे या अधिका-याने पाकिस्तानचा नागरिक असलेल्या कसाबला जिवंत पकडून भारताला पाकिस्तानविरोधातील सर्वात मोठा पुरावा म्हणून मिळवून दिला होते.
ओंबाळे यांच्यामुळे कसाब जिवंत मिळाला-
दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला सुरु करताच ओंबाळे यांना वॉकी-टॉकीवरून संदेश आला. दहशतवादी चौपाटीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत सुटल्याचा हा संदेश होता. हल्ला झाल्यावेळी ओंबाळे चौपाटीवर ड्यूटीवर होते. ओंबाळे व आणखी एक सहकारी चौपाटीवर पोहचले. तेवढ्याच कसाब व त्याच्या साथीदारांची गोळीबार करीत गाडी येत होती. जेव्हा कसाब व त्याचे साथीदार इतर ठिकाणी हल्ला करून चौपाटीवर पोहचले तेव्हा ओंबाळे यांनी कसाबला आडवले व पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसाबच्या साथीदाराने ओंबाळेवर गोळ्या झाडल्या. मात्र त्यावेळी कसाबला टाकून त्याचे साथीदार गाडीत पळून गेले. या हल्ल्यात दहशतवाद्यांना कडवा लढा देऊन त्यांचा प्रतिकार माघारी परतवण्यात मोठी भूमिका बजावली ती पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी. ओंबाळे यांनी चौपाटीवरच प्राण सोडला मात्र त्यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात यश आले.
ओंबाळेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानविरोधात भक्कम पुरावे मिळाले-
कसाब जखमी अवस्थेत तेथेच पडून राहिला. त्यामुळे पोलिसांना कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळाले. पुढे कसाबमुळेच हा खटला आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला व भारताने पाकिस्तानचे पितळ उघड पाडले. याचबरोबर हल्ल्याला चार वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये सरकारने फासावर लटकवले. त्यामुळे ओंबाळेंनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी त्यांच्या धाडसामुळे कसाब हाती लागला. ओंबाळेंच्या या कर्तृत्वामुळे 26 जानेवारी 2009 रोजी यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढे पाहा, तुकाराम ओंबाळे यांची निवडक छायाचित्रे...