आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे नगरसेवकाविरोधात 5 व्या पत्नीची तक्रार, 3 वर्षात 5 लग्ने; वाचा या \'लखोबा\'ची कथा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललित कोल्हे व त्याने भक्तीला केलेली मारहाण छायाचित्रात दिसत आहे. - Divya Marathi
ललित कोल्हे व त्याने भक्तीला केलेली मारहाण छायाचित्रात दिसत आहे.
मुंबई- जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक ललित कोल्हे याच्याविरोधात खुद्द देशाच्या उपराष्ट्रपतींनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ललित कोल्हेच्या पाचव्या पत्नीने थेट उपराष्ट्रपतींकडे आपली व्यथा मांडल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मनसेचा हा लखोबा नगरसेवक आता चांगलाच अडचणीत आला आहे.
जळगाव शहरात मनसेचा नगरसेवक असलेला ललित कोल्हे याने आतापर्यंत 5 लग्ने केली आहेत. मात्र, आता दहा-12 वर्षानंतर पाचवी पत्नी भक्ती कोल्हे हिने आपल्या लखोबा पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ललित कोल्हेने आपली फसवणूक करून अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार कोल्हेविरोधात फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकरण-
ललित कोल्हे हा जळगाव शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. त्याचे आई-वडिल व आजोबा राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत होते. त्यामुळे साहजिकच ललित पण राजकारणात ओढला गेला. मात्र, यासोबतच त्याच्यात रंगेलपणा आहे. या रंगेलपणातूनच त्याने आतापर्यंत 5 लग्ने केल्याचा दावा त्याची पाचवी पत्नी भक्ती कोल्हे हिने केला आहे. तसेच त्याच्या रंगेलपणाचा फुगा फोडण्याचे काम भक्तीने केले आहे. 5 लग्ने केल्यानंतर ललित कोल्हेचे मुंबईतील एका बारबालेशी संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. ललित कोल्हे हा धोकेबाज असून, त्याने आपली फसवणूक केली आहे असा आरोप भक्तीने केला आहे. दरम्यान, ललित कोल्हे याने भक्तीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पुढे वाचा, ललित कोल्हेने 3 वर्षात केली 5 लग्ने...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...