आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईट संगतीने CA चा झाला दहशतवादी, वाचा फाशी होणाऱ्या याकूबची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूब मेमनला कोर्टात घेऊन जाताना (फाईल फोटो) - Divya Marathi
याकूब मेमनला कोर्टात घेऊन जाताना (फाईल फोटो)
मुंबई- मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकाप्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन याकूब मेमनला येत्या 30 जुलै रोजी फासावर लटकवले जाणार आहे. मुंबईतील टाडा कोर्टाने 53 वर्षीय याकूब मेमनच्या फाशीचा वॉरंट जारी केला आहे. त्यानुसार याकूबला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात सकाळी 7 वाजता फासावर लटकवले जाईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही अडचणी आल्यास किंवा तांत्रिक समस्या उदभवल्यास नागपूरऐवजी पुण्यातील येरवडा कारागृहातही याकूबला फाशी दिली जाऊ शकते असे कळते आहे. 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटात 257 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 700 जण गंभीर जखमी झाले होते.
कोण आहे याकूब मेमन-
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू साथीदार असलेल्या टायगर मेमनचा याकूब धाकटा भाऊ आहे. मेमन कुटुंबिय मुंबईत राहते. टायगर दाऊदच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा दरारा व मानमुराब वाढला. टायगरचा धाकटा भाऊ असलेला याकूब हा मेमन कुटुंबियांतील एकमेव उच्चशिक्षित व्यक्ती. अथक मेहनत करून त्याने अवघड अशा सीए परीक्षेत यश मिळवले. मात्र, सर्व काही ठीक चालले असताना भाऊ टायगर व डॉन दाऊदमुळे याकूब गुन्हेगारी जाळ्यात गुरफटला. मार्च 1993 मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट 1992च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून केले गेले होते. त्याला हिंदू विरूद्ध मुस्लिम असे वळण मिळाले. दाऊदने त्याचा बदला घेण्याचे ठरविले. त्यासाठी दाऊदने छोटा शकिल व टायगर मेमनच्या मदतीने मुंबई बॉम्बस्फोटाचा कट रचला. छोटा शकील व टायगर हे त्याचे सूत्रधार असतील असा आदेश दाऊदने सोडला. टायगरने काम सुरु केले. या कामात त्याने सीए असलेल्या भावाला सोबत घेतले. पुढे याकूबने ठरल्याप्रमाणे सर्व कृत्ये पार पाडत गेला. अखेर 12 मार्च 1993 रोजी साखळी बॉम्बस्फोट घडविले. यानंतर दाऊद, छोटा शकील, टायगर मेमन पाकिस्तानात पळून गेले. पुढे या खटल्यात याकूब मेमन दोषी आढळला. आता त्याला फासावर लटकवले जाणार आहे.
या आरोपांत याकूब ठरला दोषी-
1993 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकाप्रकरणी याकूब मेमनवर बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्यासाठी पैसे पुरवणे व उपलब्ध करून देणे, बॉम्बस्फोट घडवून आणणा-या लोकांची मुंबईत राहण्याची व्यवस्था करणे, बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी लोकांना पाकिस्तानात ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करणे, पाकिस्तानात जाणे-येण्यासाठी प्रवासाची तिकीटे काढून देणे, बॉम्बस्फोटासाठी वाहने पुरवणे, अवैध शस्त्र बाळगणे अशा अनेक आरोपात याकूब मेमन दोषी आढळला आहे.
टाडा कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा-

टाडा कोर्टाने याकूबला 2007 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती. यानंतर याकूबने मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाकडे अपील केले. मात्र, त्याला कुठेही दिलासा मिळाला नाही. अखेर त्याने राष्ट्रपतींकडे दयायाचिका दाखल केली. राष्ट्रपतींनीही ती फेटाळली. अखेर त्याला पुढील 15 दिवसात फासावर लटवकले जाईल. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन हा एकमेव आरोपी आहे.
पुढे वाचा, कुठे आहे याकूबचा भाऊ व मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी टायगर मेमन...
बातम्या आणखी आहेत...