आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Strange Work Of Home Ministry : No Gun But Bullet Buy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहविभागाचा अजब कारभार : बंदुक खरेदी न करता नाटो बुलेटसची खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आवश्यक त्या बंदुका नसतानाही गृहविभागाने तब्बल 50 कोटी रुपयांच्या नाटो बुलेटस् खरेदी केल्या. गेल्या पाच वर्षांपासून या बुलेटस् पुण्याच्या ‘एसआरपी’ आगारात धूळखात पडून आहेत. आता सरकारने बंदुका खरेदीही केल्या तरी संबंधित बुलेटसची कार्यक्षमता संपल्याने त्याचा वापर होईलच याबाबत शंका आहे,’ अशा शब्दात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी विधान परिषदेत गृह मंत्रालयाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत राज्याने केलेल्या उपाययोजनांबाबत नियम 260 अन्वये सकाळच्या विशेष सत्रात चर्चा उपस्थित करण्यात आली होती. यावेळी शेलार यांच्यासह नीलम गो-हे, हेमंत टकले, जयदेव गायकवाड, विद्या चव्हाण, शोभाताई फडणवीस आणि सुरेश नवले यांनीही चर्चेत भाग घेतला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बिघडली असून ती सुधारली पाहिजे अशी मागणी टकले यांनी केली. तर पोलिसांवर असणारे ताण-तणाव व राजकीय हस्तक्षेपावर तोडगा म्हणजे पोलीस रिफॉर्म्स आहेत. पोलीस रिफॉर्म्स प्रत्यक्षात आणावे असे न्यायालयाने सांगूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नीलम गो-हे यांनी केला.


‘एमआयएम’वर बंदी
घाला :
दिवाकर रावते
शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी पोलिसांना लक्ष करून हतबल केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘एमआयएम’वर राज्यात बंदी घातली पाहिजे. धुळे दंगलप्रकरणी सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्यांना अटक का करण्यात आली नाही. ब्रिटिशांनी एमआयएमवर बंदी घातली असताना काँग्रेसने नांदेडमध्ये ‘एमआयएम’शी युती का केली? आझाद मैदान दंगलप्रकरणी स्मारकाची नासधूस करणा-यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? असे प्रश्न उपस्थित केले.