आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, मृतदेहाचे लचके तोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. - Divya Marathi
भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.
मुंबई- भिवंडी भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला कचरा पेटीत नेत कुत्र्यांनी त्याच्या मृतदेहाचे लचकेही तोडले. या मुलाचा दुसरा मित्र या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यापासून बचावला. मात्र त्याने घरच्यांना 2 तासांनी ही बाब सांगितल्याने त्याच्या मित्राचा मात्र मृत्यू झाला होता. 
 
कुत्र्यांनी असा केला चिमुकल्यावर हल्ला
- भिवंडीचे पोलिस निरीक्षक दिनेश काटके यांनी सांगितले की, भिवंडीतील फेनागावात डंपिंग ग्राऊंडजवळ रामू शेठ चाळीत हा चिमुकला राहत होता. धीरज यादव असे त्याचे नाव होते.
- त्याचा मृतदेह सापडला त्यावेळी त्याच्या अंगावर कोणतेच कपडे नव्हते. काही भटकी कुत्री त्याच्या मृतदेहाचे लचके तोडत होती. त्याचा मृत्यू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच झाला आहे.
- रविवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली. धीरज आपला मित्र सलमानसोबत खेळत होता. त्यांच्यावर त्यावेळी 10 ते 12 कुत्र्यांनी हल्ला केला.
- या हल्ल्यात सलमान थोडक्यात बचावला. तर धीरज मात्र तेवढा सुदैवी ठरला नाही. कुत्र्यांनी फरफटत धीरजला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेले.
 
...तर धीरज वाचला असता
- सलमान कसा तरी आपला जीव वाचवून घरी पोहचला. पण त्याने ही बाब घरच्यांना सांगितली नाही. त्याने ही बाब तातडीने घरच्या सांगितली असती तर कदाचित धीरज बचावला असता.
- सलमानला घाबरलेले पाहिल्यावर त्याच्या आईने त्याला कारण विचारले. त्यावेळी त्याने कारण सांगितले. त्यानंतर धीरजच्या घरचे आणि आजुबाजूचे लोक घटनास्थळी पोहचले. पण तोपर्यंत धीरजचा मृत्यू झाला होता. 
- धीरजच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...