आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप मित्रपक्षांत धुसफूस, नेत्यांना मंत्रिपदे मिळताच रासप, स्वाभिमानीत अंतर्गत संघर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- भाजपच्या नेतृत्वाखालील  महायुतीच्या घटक पक्षांना मंत्रिपदे मिळून काही महिने उलटत नाहीत तोच या पक्षांतील अंतर्गत धुसफुशीला उधाण आले. रासप, स्वाभिमानी संघटना, शिवसंग्रामसह भाजप व शिवसेनेत अंतर्गत धगधग जाणवत आहे. आगामी महापालिका, जि. प. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अंतर्गत तणावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यातून सत्तेच्या सारिपाटावरील कोणता मोहरा कसे फासे टाकतो अन् कोणत्या पक्षाला त्याचा फटका बसतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
  
स्वाभिमानीत तणाव  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि संघटनेचे ज्येष्ठ नेते सदाभाऊ खोत यांच्यात नेतृत्वाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे. संघटनेच्या बळावर निवडून न येताही पहिल्यांदा विधान परिषदेत आणि नंतर थेट राज्याच्या मंत्रिमंडळात गेलेले खोत आता शेट्टी यांच्या अनुमतीशिवाय परस्पर निर्णय घेऊ लागले आहेत.  स्वत: शेट्टी यांनीही यासंदर्भात सूचक मौन बाळगल्याने ‘स्वाभिमानी’च्या या दोन्ही सर्वोच्च नेत्यांमध्ये तणाव असल्याच्या शंकेला पुष्टी मिळत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.   

आमने - सामने :  ‘मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. त्यांच्या मंत्रिमंडळाचा सदस्य या नात्याने ते देतील ती जबाबदारी स्वीकारणे हे माझे काम आहे. मात्र या मुद्द्यावरून अकारण राजकारण पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही विघ्नसंतोषी लोक आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शेट्टी यांच्यासोबत मी पंचवीस वर्षे काम करत आहे एवढेच मी त्यांना सांगू इच्छितो.’ : सदाशिव खोत   

‘जो भारतीय जनता पक्ष सुरुवातीला आम्हाला सत्तेत वाटा द्यायला टाळाटाळ करत होता तोच पक्ष आता सरकार बळकट करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्याची मदत घेताना दिसतो आहे. कार्यक्षम कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे वानवा असल्याने बहुधा त्यांनी खोत यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवली असावी,’  :  राजू शेट्टी

मुख्यमंत्र्यांची साथ? खोत भाजपच्या वाटेवर
सत्ता असो-नसो  फरक पडत नसल्याची स्पष्ट भूमिका शेट्टी यांची आहे. मात्र सत्ता असेल तर भरीव कामे करून दाखवता येतील, असे खोत यांना वाटते. शेट्टी-खोत संघर्षाचे हेही कारण असल्याचे सूत्रांचे मत आहे. यामुळेच वेळप्रसंगी खोत सत्तेसाठी भाजपमध्येही जातील अशी चर्चा ‘स्वाभिमानी’च्याच कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियात सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पट्ट्यात सदाशिव खोत यांच्या रूपाने मराठा नेतृत्व प्रस्थापित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याचेही दाखले त्यासाठी दिले जात आहेत.

महादेव जानकरांचा ‘रासप’ फुटला; ४० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे 
मुंबई- ‘बसप’ अध्यक्ष कांशीराम यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेला ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ गुरुवारी फुटला. पक्षाच्या ४० पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्या मनमानीला कंटाळून आपण सामूहिक राजीनामे देत असल्याचे सांगितले. फुटून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी ‘प्रज्ञा सुराज्य पक्ष’ असा नवा पक्ष स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा या वेळी केली. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ‘रासप’ने भाजपशी युती केली होती. िवधानसभेला ‘रासप’चा एक आमदार निवडून आला, तर विधान परिषदेवर महादेव जानकर यांना घेण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपदही उर्वरित. पान १०

िमळाले. त्यानंतर पक्षात धुसफूस सुरू झाली होती. 
राऊत यांच्याकडे नेतृत्व :  राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व दशरथ नाना राऊत यांनी केले. राऊत बारामतीचे असून जानकर यांच्या धनगर समाजापैकीच आहेत. २००३ पासून ते जानकर यांच्यासोबत काम करतात. राऊत यांनी २००९ मध्ये अजित पवार यांच्याविरोधात बारामती िवधानसभेची िनवडणूक लढवली होती. सध्या ते केंद्रीय सचिव म्हणून पक्षात कार्यरत होते. राजीनामे सादर केलेल्यांमध्ये ‘रासप’चे ४ विभागीय अध्यक्ष, १५ िजल्हाध्यक्ष, २० तालुकाध्यक्ष यांच्यासह पक्षाचे मॅनेजमेंट गुरू भीमराव जामुने, प्रवक्ते विष्णू चव्हाण, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि केंद्रीय सचिव दशरथ राऊत यांचा समावेश आहे. 
 
मुंडे िवरोधकांची फूस :  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना महादेव जानकर बहीण मानतात. जानकर यांनी आपली सर्व ताकद पंकजा यांच्या पाठीशी उभी केली आहे. त्यामुळे भाजपमधला पंकजाविरोधी गट जानकर यांच्याविरोधात गेला. या गटाने जानकर यांच्या पदाधिकाऱ्यांना फूस लावली, असे रासपच्या महत्त्वाच्या नेत्याने ‘िदव्य मराठी’ला सांगितले. 

‘रासप’तील धुसफुशीची कारणे 
- पदाधिकाऱ्यांची कामे होत नाहीत.
- आयत्या वेळी पक्षात आलेल्यांना महत्त्व िदले.
- जानकर अरेरावीची भाषा करतात.
- पुण्यातील पक्षाच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांकडून २ ते ५ हजार रुपये निधी जमा केला होता. तो निधी खर्च केला नाही.
- कार्यकर्त्यांना ितकीट दिले जात नाही.
- मंत्री झाल्यापासून जानकर कार्यकर्त्यांना भेटत नाहीत.

स्वाभिमानीतील नाराजीची कारणे
- शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात निमंत्रण न मिळाल्याने शेट्टी नाराज झाले होते. तरी त्यांच्या नाराजीकडे लक्ष न देता खोत या कार्यक्रमात सहभागी झाल्याने शेट्टी दुखावले होते.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच खोत यांच्यावर अतिरिक्त  जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी खोत यांनी शेट्टी यांच्याशी चर्चा केली नाही.
- मंत्री  झाल्यापासून खोत यांच्या वर्तनावर कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. {पक्षाध्यक्षाला न जुमानता पद स्वीकारल्याने शेट्टी व खोत यांच्यात तणाव.
बातम्या आणखी आहेत...