आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- बीड येथील आदित्य डेंटल कॉलेजमधील अपु-या सुविधा आणि संस्थाचालकाच्या धमकीमुळे त्रस्त झालेल्या 32 विद्यार्थ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली. दुस-या वर्षासाठी इतर महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावा, अशी या विद्यार्थ्यांनी मागणी आहे.
बीडच्या आदित्य डेंटल महाविद्यालयात प्राध्यापक, ग्रंथालय, आॅपरेशन थिएटर इत्यादी कोणत्याच सुविधा नाहीत. याविरोधात आवाज उठवल्यास व्यवस्थापनाच्या वतीने धमकावण्यात येत असल्याचा आरोप या 32 विद्यार्थ्यांनी केला. महाविद्यालयाच्या संचालिका आदिती सारडा यांनीही अनेकांना धमक्या दिल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला.
संस्थाचालक सारडा कॉँग्रेसशी संबंधित
बीडमध्ये आदित्य संस्थेची अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच व्यवस्थापनाचे शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. त्यातील वैद्यकीय महाविद्यालयची परवानगी नुकतीच रद्द करण्यात आली आहे. या संस्थेचा कारभार आदिती सारडा यांच्या हातात आहे, त्या ‘एनयुएसआय’चे महासचिव आदित्य सारडा यांच्या भगिनी आहेत.
गावित यांना भेटणार
बीडच्या आदित्य डेंटल महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात सध्या 75 मुली आणि 25 मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील 32 मुला-मुलींनी संस्थेच्या कारभारा विरोधात संघर्ष सुरू केला आहे. त्यातील बहुसंख्य विद्यार्थी मुंबईतील आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची बुधवारी भेट घेणार असल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन अन्यायाची कैफियत मांडली. त्यावर ‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. संबंधित दोषींवर कारवाईचे आदेश दिले जातील,’ असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.