आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Across Mumbai Campuses Protest Rohith Suicide

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : मुंबईत मूकमोर्चा काढून निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हैदराबाद विद्यापीठातील दलित संशोधक विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी रविवारी मुंबईतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ‘राजगृह ते चैत्यभूमी’ या मार्गावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मूकमोर्चा काढला.
वेमुला याच्या आत्महत्येचे पडसाद मुंबईत मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. दररोज दोन-तीन मार्चे िनघत असून िवविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून निदर्शनेही केली जात आहेत. रविवारी िनघालेला मोर्चा कोणत्या पक्षाचा वा संघटनेचा नव्हता. मोर्चात काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील आदी नेते सहभागी झाले होते. दादर येथील हिंदू काॅलनीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह इमारतीपासून मोर्चास दुपारी प्रारंभ झाला. मूकमोर्चा असल्याने सर्वांनी तोंडावर काळी पट्टी बांधली होती. टिळक ब्रीज, प्लाझा सिनेमा, िशवाजी पार्क मार्गे हा माेर्चा चैत्यभूमीवर पोहोचला. मोर्चात सुमारे पाचशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सामाजिक भवितव्य अंधारात : अाव्हाड
‘केंद्र सरकार आणि भाजप बाबासाहेबांचे एकीकडे गुणगान करतात. दुसरीकडे दलित, आदिवासींचे अधिकार काढून घेण्याचे कारस्थान करत अाहेत’, असा आरोप आव्हाड यांनी केला. लोकसभेचे अध्यक्ष जर आरक्षणाच्या िवरोधात बोलत असतील, तर या देशातील सामािजक न्यायाचे भवितव्य अंधारात आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.