आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अायटी’राज्य : विद्यार्थ्यांना ४५ मिनिटे माेफत वायफाय सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील ७७६ पैकी ५०० ग्रामपंचायतींना मोफत वायफाय सेवा देऊ केली. या सेवेच्या या गावातील सुमारे दोन लाख कुटुंबांनी चांगलाच वापर केला असून सरासरी प्रत्येक कुटुंबाने महिन्याला १५ जीबीचा डाटा डाऊनलोड केला आहे. दाेन ऑक्टोबरपासून संपूर्ण नागपूर जिल्हा वायफाय केला जाणार असून त्यानंतर २०१८ पर्यंत संपूर्ण राज्य वायफाय करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट अाहे. पुढील मार्चपासून विद्यार्थ्यांना व अाॅनलाईन शासकीय सेवांचा उपयाेग घेणाऱ्यांना दरराेज अर्धा तास ते ४५ मिनिटे माेफत वायफाय सेवा मोफत दिली जाणार असून त्यानंतरच्या काळासाठी मात्र पैसे द्यावे लागतील, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव विजय कुमार गौतम यांनी दिली.
‘एकाच वेळेच दोन लाख परिवारांना मोफत वायफाय सेवा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. मात्र या याेजनेची म्हणावी तशी प्रसिद्धी झाली नाही. अाता संपूर्ण राज्यच वायफाय करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असून त्यादृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. ग्रामपंचायतीत वायफाय सुविधा दिल्यामुळे तरडी बुद्रुक येथील एक शाळा गुगलच्या मदतीने संपूर्णपणे स्मार्ट शाळा करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी या याेजनेचाचांगला लाभ घेतल्याचा अहवाल आहे,’ असे गाैतम यांनी नमूद केले.

ग्रामीण भागात वायफाय सेवा दिल्याने तेथील नागरिकही आता अाॅनलाईन जगाशी जोडले गेले आहेत. नागपूर जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींमधील प्रत्येक नागरिकांनी दरमहा सरासरी १५ जीबी डाटा डाऊनलोड केला आहे. नवीन सेवा असल्याने डाऊनलोड करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्वांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर ५४४८ जीबी म्हणजेच ५ टेराबाईट डाऊनलोड केला. गावांत सध्या ही सेवा मोफत असली तरी पुढील वर्षी मार्चनंतर या सेवेसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र विद्यार्थी आणि शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्धा ते पाऊस तास मोफत वाय फाय दिले जाणार आहे. सन २०१८ पर्यंत संपूर्ण राज्य वायफाय केले जाणार असून सर्व सरकारी सुविधा ऑनलाईन दिल्या जाणार आहेत. यात सातबाराचे उतारे देण्यापासून मार्कशीट, सर्व प्रकारचे दाखलेही ऑनलाईन देण्याचा समावेश अाहे. यात महत्वाची कागदपत्रे म्हणजेच जातीचा दाखला वगैरेसाठी क्लाऊड सुविधाही दिली जाणार आहे,’ असे गाैतम म्हणाले.

नाेंदणीकृत विवाहाची अाता ऑनलाइन साेय
सध्या नाेंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जावे लागते. मुलगा आणि मुलीला साक्षीदारांच्या सह्या असलेले फॉर्म भरून द्यावे लागतात. त्यानंतर त्यांना तारीख दिली जाते. परंतु आता नाेंदणीकृत लग्नही ऑनलाइन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांना लग्न करायचे आहे त्यांनी ऑनलाइन फॉर्म भरून आपला आधार क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर त्यांना थेट विवाह नाेंदणीचे प्रमाणपत्र दिले जाईल असेही विजयकुमार गौतम यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...